देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट लावला उधळून...

पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फटके व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. या कटामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेतले आहे.

मुंबईतील अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांचा मोठा निर्णय...

पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फटके व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. या कटामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या सांगण्यावरून दहशतवादी रामलीला आणि नवरात्रोत्सवात बॉम्बस्पह्ट घडवण्याच्या तयारीत होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पत्रकार परिषदेत या मोठया कारवाईची माहिती दिली. दहशतवाद्यांचे नेटवर्क विविध राज्यांमध्ये पसरले होते. दिल्ली पोलिसांनी मागील महिनाभर मल्टीस्टेट ऑपरेशन चालवले. ठिकठिकाणी कारवायांचा धडाका लावला आणि विविध राज्यांतून 6 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

ऐन सणासुदीत हिंदुस्थानात मोठी जीवितहानी घडवण्याचा पाकिस्तानचा कट होता. यासाठी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात बॉम्ब बनवण्याचे आणि एके-47 चालवण्याचे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन दहशतवादी एप्रिल महिन्यात मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानला नेण्यात आले होते. दहशतवाद्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करताना पहिली अटक महाराष्ट्रातून करण्यात आली. सर्वात आधी दहशतवादी सालेमला पकडण्यात आले. दोघांना दिल्लीतून अटक केली, तर उत्तर प्रदेशातून तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तसेच बांग्ला बोलणाऱया इतर 15 जणांनाही दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याचाही संशय आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

अटक करण्यात आलेल्यांनी सांगितले की, मस्कदहून पाकिस्तानला जाताना त्यांच्यासोबत बंगाली भाषा बोलणारे १४ ते १५ जण होते. त्यांनीही असेच प्रशिक्षण घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सिद्ध होते की, हे ऑपरेशन सीमेपलीकडून हाताळण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त निरज ठाकूर यांनी दिली. विशेष म्हणजे हे दहशतवादी महाराष्ट्रात रेकी करून गेल्याची माहितीही उघडकीस येत आहे.

राज्यातील पोलिस अधिकाऱयांच्या बदल्या; पाहा नावे...

दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल जवळपास महिनाभरापासून या ऑपरेशनसाठी काम करत होते. हे दहशतवादी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना लक्ष्य करण्यासाठी कट रचत होते. त्यांच्याकडून स्फोटकं आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यातील दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी करत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. आता पोलीस त्यांची रिमांड घेतील आणि चौकशी करतील. हे दहशतवादी शेवटी कोणत्या उद्देशाने इथे आले होते आणि त्यांचा खरा हेतू आणि लक्ष्य काय होते हे चौकशीनंतरच उघड होईल.

पुणे ग्रामीणच्या महिला पोलिसांसाठी आंनदाची बातमी...

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (वय ४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी कुटुंबियांची राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आले आहे.

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Delhi Police Special Cell arrested 6 people including two te
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे