सायबर क्राईममध्ये चुकून पैसे गेलेच तर प्रथम हे करा...

एखादी व्यक्ती चुकून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडली तर चोरीला गेलेले पैसे 24 तासांच्या आत पुन्हा अकाउंटला येतील, अशी व्यवस्था या यंत्रणेत तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली असून, अनेकांना त्याचा फटका बसला आहे. पण, नागरिकांना यापासून दिलासा मिळण्यासाठी केंद्र सरकारने एक यंत्रणा उभी केली आहे. एखादी व्यक्ती चुकून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडली तर चोरीला गेलेले पैसे 24 तासांच्या आत पुन्हा अकाउंटला येतील, अशी व्यवस्था या यंत्रणेत तयार करण्यात आली आहे.

ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीला राजस्थानमधून अटक

केंद्रीय गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल विकसित केले आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx ही त्याची लिंक आहे. या वेबसाइटवर 155260 हा हेल्पलाइन नंबर (Helpline) देण्यात आला आहे. तो आपल्या फोनच्या काँटॅक्ट्समध्ये सेव्ह करून ठेवावा.

तुम्हाला एक लाख रक्कमेचे कर्ज मंजूर झाले आहे...

दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातले नागरिक या हेल्पलाइन क्रमांकावर आठवड्याच्या सातही दिवशी कोणत्याही वेळी कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा हेल्पलाइन क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत खुला असतो. त्या वेळेत तक्रार नोंदवता येऊ शकते.

जुनी नाणी आणि नोटांच्या खरेदी-विक्री बाबत अलर्ट जारी...

समजा, तुम्ही दुर्दैवाने ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडला असाल, तर 155260 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुमची तक्रार दाखल करावी लागेल. तक्रार दाखल करताना नेमकी कशा प्रकारची फसवणूक झाली आहे याची पूर्ण माहिती द्यावी. ही फसवणूक कोणत्या वेळी घडली याची माहिती द्यावी. शिवाय, तुमचे बँक खाते, पत्ता, तसेच तुमचे पैसे ज्या बँक खात्यात किंवा ई-वॉलेटमध्ये ट्रान्स्फर झाले असतील, त्याची पूर्ण माहितीही या कॉलमध्ये द्यावी लागेल. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारेच पुढील तपास करून पैसे परत मिळू शकतात.

इंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱयास बिहारमधून अटक

155260 या क्रमांकावर तुम्ही कॉल केला, की तो सायबर क्राइम विभागाच्या कॉल सेंटरवर पोहोचतो. तुमच्याकडून सायबर फसवणुकीबद्दलची सर्व माहिती घेऊन ती रेकॉर्ड केली जाते. तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तुमचे पैसे ज्या बँक खात्यात पोहोचले असतील, ते खाते सायबर क्राइम सेलद्वारे गोठवले जाते. त्यामुळे ते खाते ज्या कोणाच्या मालकीचे असेल, ती व्यक्ती खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा कुठे ट्रान्स्फरही करू शकत नाही.

प्रिय ग्राहक, अपना जनता बँक द्वारे मिळवा पर्सनल लोन...

तुम्ही केलेली तक्रार खरी आहे, याची शहानिशा केली जाते. त्यानंतर तुमच्या खात्यातून जेवढे पैसे वळते झाले असतील, ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यात पाठवले जातात. ज्या बँकेच्या खात्यात ते पैसे गेले असतील, त्या बँकेकडून ही प्रक्रिया केली जाईल.

Paytm या ऍपद्वारे परस्पर रक्कम काढणाऱयास गुजरातमधून अटक

या गोष्टी लक्षात ठेवाः
-  सायबर फ्रॉडला बळी पडल्यानंतर तत्काळ 115260 या क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करा.
- मुळात अशी फसवणूक होणारच नाही, यासाठी दक्ष राहा. कोणीही अनोळखी व्यक्तीने बँकेचे डिटेल्स मागितले किंवा ओटीपी मागितला, तर देऊ नका.
- अनोळखी कॉल आल्यास चुकूनही जास्त वेळ बोलू नका. बोलण्यात गुंतू नका.
- फोनवर कोणती लिंक आली आणि त्यावर क्लिक करायला सांगण्यात आले असेल, तर त्यावर क्लिक करू नये.
- अखंड ते सावधपण हे तत्त्व कायम अंगी बाळगावे.

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: cyber crime victims of cyber fraud can get back their lost m
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे