फोन पे ला पासवर्ड असतानाही कसे काय गायब झाले पैसे?

मोबाईल गहाळ झाल्यानंतर फोन पे वरून पैसे काढल्याची घटना घडली आहे.

पुणेः शिरूर तालुक्यातील एकाचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर फोन पे वरून पैसे काढल्याची घटना घडली आहे. यामुळे सायबर क्राईम पोलिसांपुढे आरोपी शोधून काढण्याचे आव्हान आहे.

ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून हॅक; पण...

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्रशांत सांगडे यांचा मोबाईल कवठे येमाई ते शिरुर रस्त्यावर प्रवास करताना गहाळ झाला होता. मोबाईल व फोन पे ला पासवर्ड टाकलेला होता. तरीही या फोन पे वरुन दोन दिवसात अज्ञाताने परराज्यात वेगवेगळया वस्तू खरेदी केल्या आहेत. एकूण ७८,००० रुपये अज्ञानाने फोन पे केले आहेत. 

बिबवेवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यास हरियाणामधून केली अटक...

मोबाईल चोरी करुन तो हॅक करून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पासवर्ड मिळवला जातो. त्यामुळे मोबाईल मधील डाटा सुरक्षित नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरीकांनो मोबाईल वापरताना काळजी घ्यायला हवी. मोबाईल हरवल्यास अथवा चोरी गेल्यास तात्काळ फोन पेवरील बँक खाते असणाऱ्या बॅंकेत त्वरीत संपर्क करावा. सविंदणे येथील युवकाला गोड बोलून बॅंकेतून बोलत आहे, आधार कार्ड बॅक खात्याला जोडायचे आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा. ओटीपी सांगताच अचानक अंकांऊट मधून ५०,००० रुपये कट झाले. अशा प्रकारे सायबर क्राईम मोठया प्रमाणावर घडत असून अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांना तात्काळ घटना सांगून तक्रार दाखल केली पाहिजे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे सायबर पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, या आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

युपीआय व क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे घेतले काढून...

'मोबाईल सिम बंद होणार आहे. केवायसी करा' असा मेसेज आला तर...

युवकाने दिवंगत वडिलांचे लाखो रुपये ऑनलाईनमध्ये गमावले...

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लग्न करायचे आहे; असे म्हणाली अन्...

Video: सायबर गुन्हेगार ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात अन्...

मी तुझ्या आत्याचा मुलगा बोलत आहे, असे म्हणाला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: cyber crime news youth missing mobile and phone pay ammount
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे