लोन अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले कर्ज अन् पुढे घडले भयानक...

लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर होणाऱ्या त्रासातून सोहेल शेख या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे: लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर होणाऱ्या त्रासातून सोहेल शेख या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोहेल शेख याने लोन ॲपवरून कर्ज घेतले होते. सदर कर्ज घेतल्यानंतर परतफेडीसाठी अनोळखी नंबरवरून त्याला धमकी आणि बदनामीचे फोन येऊ लागले होते. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला होता. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने सोहेल शेख याने आत्महत्या केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोन अ‍ॅप्स सुरूवातीला कागदपत्रांशिवाय कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. यासाठी व्याजदरही मोठा आकारण्यात येतो. हे कर्ज तुम्ही वेळेत परत न केल्यास पैसे वसूल करणारे लोन शार्क्स तुमची पब्लिकली उपलब्ध असलेली माहिती वापरून तुम्हाला धमकी देऊ लागतात. यामध्ये मग तुमचे फेसबुकवरील फोटो घेऊन त्यांना अश्लीलरित्या मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देणे किंवा तुमच्या ओळखीतील लोकांना किंवा कुटुंबीयांना फोन करून धमकी देणे असे प्रकार सुरू करतात.

पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...

सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: cyber crime news youth boy took loan from loan app then afte
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे