इंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱयास बिहारमधून अटक
लकी ड्रॉ मध्ये महिंद्रा कंपनीची XUV लागली आहे. फिर्यादीला विश्वासात घेवून त्याचे बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्यावर इंटरनेट बैंकिंग ऐक्टिव करुन त्यांची एकूण १४,१७९६४ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.वर्धा: इंटरनेट बँकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धा यांना यश आले आहे. १७ लाख रुपयाच्या फसवणुकीचा गुन्हा उघड केला आहे.
तुम्हाला एक लाख रक्कमेचे कर्ज मंजूर झाले आहे...
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी बंडू हुडे (रा. वायगाव, ता. जि. वर्धा) यांनी पोलिस स्टेशन देवळी येथे तक्रार नोंदवली होती. २८/०१/२०२१ रोजी त्यांना फोनद्वारे अज्ञाताने सांगीतले की, आपण ऑनलाईन बोलावलेल्या सैंडलवर लकी ड्रॉ मध्ये महिंद्रा कंपनीची XUV लागली आहे. फिर्यादीला विश्वासात घेवून त्याचे बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्यावर इंटरनेट बैंकिंग ऐक्टिव करुन त्यांची एकूण १४,१७९६४ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीस त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यावरुन त्याने पोलिस स्टेशन देवळी येथे अप क्र. ११६/२०२१ कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (ड) आय.टी. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवला होता.
संरपंचांची ऑनलाईन फसणूक करणारा ठकबाज ताब्यात...
दुसऱया फिर्यादी श्रीमती वर्षा कंडमबेथ (रा. सावंगी (मेघे) वर्धा) यांना अज्ञाताने फोनद्वारे क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवून ओटीपी मागितला. त्यांची एकूण १,६७,००० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यांनी पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) येथे दाखल अप.क्र. ७७/२०२१ कलम ४२० भादंवि. ६६ (डी) आय.टी.अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवला. दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात येत होता. सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यासाठी पथक तयार करून बिहार येथे पाठविण्यात आले होते.
पुणे शहरातील युवतीची लाखो रुपयांची फसवणूक; कशी ती पाहा...
पोलिस स्टेशन, देवळी अप.क्र. ११६/२०२१ मधील आरोपी हर्षत पशुपती सिंग (वय २७, रा. खगडिया) यास खगडिया राज्य बिहार येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) अप.क्र. ७७/२०२१ या गुन्ह्यातील आरोपी अशोक कुमार पुना रविदास (रा, कोचरा, जिल्हा नालंदा, राज्य बिहार) यास हुलासगंज (जिल्हा जहानाबाद, बिहार) येथून ताब्यात घेतले. परंतु, सदर आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्यास सीआरपीसी कलम ४१ (१)(बी) प्रमाणे सूचनापत्र देण्यात आले. अशा पध्दतीने दोन्ही गुन्हे उघडकीस आणले.
धक्कादायक! महिला डॉक्टरच्या बेडरुममध्ये सापडला स्पाय कॅमेरा...
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे निर्देशाप्रमाणे सावंगी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे, पोलिस अंमलदार निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, अंकित जीभे, सायबर शाखा, अमरदीप वाढवे, आकाश कसर, सायबर पथक यांनी केली.
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
Yogesh narnaware
Posted on 24 July, 2021Majhe pn asech 39000 rs online yqchyatun gele ahe aditya Birla online finance ya companine mla loan deto manun majhyakadun 39000rs refundable krto mnun ghetale pn mla loan pn nahi midale ani majhe paise pn parat nahi midale