एटीएम सेंटरवर पाळत ठेवून मदत करण्याच्या बहाणा करायचे अन्...
महिलांना, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर एटीएम सेंटरवर पाळत ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने पिन नंबर विचारून कार्ड अचानक बदलून नंतर खात्यातून पैसे काढून पसार व्हायचे.मुंबई : महिलांना, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर एटीएम सेंटरवर पाळत ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने पिन नंबर विचारून कार्ड अचानक बदलून नंतर खात्यातून पैसे काढून पसार व्हायचे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली तसेच आजूबाजूच्या परीसरातील नागरीकांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्य एटीएम फ्रॉड करणाऱ्या टोळीचा ठाणे खंडणी विरोधी पथकाने भंडाफोड केला आहे.
एका आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना पोलिसांना जेरबंद केले असून आठ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या टोळीचे सदस्य ज्यांना एटीएम सेंटरमधून पैसे काढता येत नाहीत, त्यांना हेरून मदत करण्याच्या बहाण्याने लुटायचे. त्यांच्याकडून एटीएमचा पिन नंबर घेऊन त्यांचे कार्ड बदलून ते पैसे काढून पळायचे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना पंढरपूरातून आणि एकाला उल्हासनगरातून अटक केली आहे. सनी मुन्ना सिंग (वय 28), श्रीकांत गोडबोले (वय 28), हरिदास मगरे (वय 25) आणि रामराव शिरसाट (वय 35) यांना पोलिसांनी 70,000 रोख आणि ₹4.06 लाख किमतीची वाहनांसह अटक केली आहे.
भिवंडी येथील रुपाली सतीश बोईरे (वय 32) यांचे एटीएम कार्ड एका व्यक्तीने बदलून तिच्या खात्यातून 38,500 रुपये काढून घेतल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. गुप्त बातमीदारांकडून या आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, तक्रारदारांचे सर्व एटीएम कार्डही जप्त केले आहेत. आरोपींकडून चोरीची 101 एटीएम कार्डेही जप्त केली आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.
हॅलो, एसबीआय बँकेमधून बँक अधिकारी मनीष शर्मा बोलतोय....
ऑनलाईन सेक्सटॉर्शन! पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आवळल्या आरोपीच्या मुसक्या...
पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...
स्वारगेट पोलिसांनी 'यु ट्यूब'वरील बंटी-बबलीला गुजरातमधून केली अटक...
हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...
सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...
बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...
Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस
मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...
वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...
आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.