शेतकऱयाची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कल्पेश राखोंडे हे करत आहेत.

पुणेः विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याची एक मशीन घेऊन देण्याच्या बहाण्याने तब्बल चार लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अरुण आसाराम परांडे या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी...

विठ्ठलवाडी येथील शेतकरी अनिल ढवळे यांनी फेसबुकवरुन एका मशीनची जाहिरात पाहिली होती. त्यांनतर त्यांनी त्यांच्या मोबाइल वरून सदर जाहिरात देणाऱ्या डिझायर इंडिया या कंपनीच्या मोबाईल वर संपर्क साधत माहिती घेतली. त्यांना कंपनीतील अरुण परांडे या व्यक्तीने मशीन बाबत माहिती देत मशीनची किंमत दहा लाख रुपये असून, पाच लाख रुपये भरावे लागेल असे सांगितले. त्यांनतर ढवळे यांनी वेळोवेळी सदर व्यक्तीने सांगितलेल्या कंपनीच्या खात्यावर चार लाख पस्तीस हजार रुपये जमा केले. मात्र, त्यांनतर वेळ देऊन देखील कंपनीने ढवळे यांना मशीन पाठवली नाही. फोन केला असता वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली.

आपण यांना कोठे पाहिलेत का?

आजीला म्हणाले; गळ्यातील सोन्याचा दागिना काढून नोटेला लावा...

आपली मशीन खरेदी मध्ये फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने अनिल शिवाजी ढवळे (वय ४१ वर्षे रा. विठ्ठलवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी डिझायर इंडिया या कंपनीच्या अरुण आसाराम परांडे (रा. औरंगाबाद) याचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कल्पेश राखोंडे हे करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: cyber crime news shirur taluka farmer see ad on facebook and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे