एटीएममधून एक हजार ऐवजी 20 हजार रूपये निघत राहायचे...

नायजेरीयन महिलेने पुण्यासह विविध शहरात अशा पध्दतीने साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे: एटीएम मशीनला डिव्हाईस जोडून मशीनचा ताबा घेत पैसे काढणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या नायजेरीयन महिलेला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. बेनी उर्फ ब्लेसींग उर्फ सॅन्ड्रा नंतोनगो (वय 26, रा. फेज थ्री मेट्रो स्टेशन, गुरूग्राम) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

एटीएममध्ये छेडछाड करून पैसे काढणारे उत्तर प्रदेशातून अटकेत...

नायजेरीयन महिलेने पुण्यासह विविध शहरात अशा पध्दतीने साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यात पूर्वी तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. ते सध्या कारागृहात असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी शहरात शिवाजीनगर, मार्केटयार्ड, विमानतळ अशा विविध ठिकाणी एटीएम मशीनला डिव्हाईस लावून पैसे काढले होते. आरोपी हे एटीएम मशीनच्या पाठीमागे अससेल्या नेटवर्क केबलच्या ठिकाणी डिव्हाईस जोडत होते. त्यानंतर एटीएम मशीन हॅक करून त्याचा ताबा घेउन एटीएम कार्ड टाकून एक हजार रूपयांचा आकडा टाकत होते. पण, त्यावेळी मशीनमधून एक हजार ऐवजी 20 हजार रूपये निघत होते. यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचा ट्रे रिकामा होत नाही, तोपर्यंत आरोपी पैसे काढत होते. 

सायबर क्राईममध्ये चुकून पैसे गेलेच तर प्रथम हे करा...

दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी बेनी राजस्थान येथील एका गुन्ह्यात पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक निरीक्षक मीनल सुपे यांच्या पथकाने केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जुनी नाणी आणि नोटांच्या खरेदी-विक्री बाबत अलर्ट जारी...

तुम्हाला एक लाख रक्कमेचे कर्ज मंजूर झाले आहे...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: cyber crime news pune police nigerian women arrested for mon
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे