'सेक्सटॉर्शन'च्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; पुणे पोलिसांची मोठी कारवाई...

पुणे शहरातील एका तरुणाला व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉल करून त्या तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला.

पुणेः पुणे शहरातील एका तरुणाला व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉल करून त्या तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली होती. त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सतत आठ दिवस-रात्र रेकी केली. त्यानंतर राजस्थानमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन राजस्थानमधील भरतपूर परिसरातील रायपूर सुकेती गाव गाठले. या गावातून एका २४ वर्षीय युवकाला अटक केली. सेक्सटॉर्शनच्या धंद्यात रायपूर सुकेतीमधील आणखी काही सामील असल्याचा संशय पोलिसांनी आहे. या व्यक्तीने महिलेचा व्हॉटसअ‍ॅप डिपी असलेल्या मोबाईलवरून पुणे शहरातील युवकाला व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल केला. आरोपीने अश्लील चॅटिंगमध्ये गुंतवून त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी त्या तरुणाला दिली होती.

'सेक्सटॉर्शन'च्या त्रासाला कंटाळलेल्या युवकाने बदनामी होईल म्हणून त्याने‘फोन पे’वर पैसे पाठवले. त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे तरुणाने ‘मैं सुसाईड कर रहा हूं’ असा मेसेज पाठवला. तरीही आरोपीने ‘करो मैं व्हिडिओ ऑनलाइन करता हूं’ असे म्हणून सतत पैशांची मागणी करत राहिला. अखेर, युवकाने आत्महत्या केली.

युवकाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्याचा मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर सहकारनगर पोलिसांचे एक पथक राजस्थान येथील सुकेती गावात गेले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग आठ दिवस-रात्र रेकी करुन आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय? 
मोबाईलवर अनोळखी मैत्रीची विनंती पाठवतात. आकर्षक फोटो टाकलेल्या त्या युवतीच्या विनंतीला अनेकजण फसतात. त्यानंतर जाळ्यात ओढून युवकांचे आक्षेपार्ह अवस्थेतील स्क्रीनशॉट व रेकॉर्डींग आरोपी मोबाइलवर काढतात. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली जाते. या गु्न्ह्यांना सेक्सटॉर्शन म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

महिला व्हिडिओ कॉलवर झाली नग्न आणि पुढे घडलं भयानक...

ऑनलाईन सेक्सटॉर्शन! पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आवळल्या आरोपीच्या मुसक्या...

पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

स्वारगेट पोलिसांनी 'यु ट्यूब'वरील बंटी-बबलीला गुजरातमधून केली अटक...

हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...

सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: cyber crime news pune police arrested youth from rajasthan f
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे