कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला अन्...
काही रोख स्वरुपात तर काही ऑनलाईन पद्धतीने तब्बल पाच लाख बावन्न हजार रुपये घेतले.पुणेः कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील एका टुरिस्ट व्यवसायिकाला मी फ्लिपकार्ड कंपनीचा अधिकारी असून, तुम्हाला स्वस्तात मोबाईल व लॅपटॉप सह आदी साहित्य घेऊन देतो म्हणून पाच लाख बावन्न हजार रुपयांची फसवणूक केली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अंबादास नारायण गायकवाड याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारची 16 यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई, पाकचे चॅनेल्स...
कान्हूर मेसाई येथील प्रदीप उकिर्डे यांचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायातून त्यांची अंबादास गायकवाड याच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, गायकवाड याने मी फ्लिप कार्ड कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. मी तुम्हाला स्वस्तात मोबाईल व लॅपटॉप तसेच आदी साहित्य घेऊन देतो, असे म्हणून उकिर्डे यांच्याकडून काही रोख स्वरुपात तर काही ऑनलाईन पद्धतीने तब्बल पाच लाख बावन्न हजार रुपये घेतले. त्यांनतर आज उद्या वस्तू येतील असे सांगून नंतर सदर व्यक्ती बेपत्ता झाला.
'मोबाईल सिम बंद होणार आहे. केवायसी करा' असा मेसेज आला तर...
उकिर्डे यांनी वेळोवेळी त्याच्याशी फोनवर संपर्क केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रदीप दिलीप उकिर्डे (वय ३२ वर्षे रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अंबादास नारायण गायकवाड (रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पठारे व पोलिस नाईक अमोल नलगे हे करत आहेत.
युवकाने दिवंगत वडिलांचे लाखो रुपये ऑनलाईनमध्ये गमावले...
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लग्न करायचे आहे; असे म्हणाली अन्...
Video: सायबर गुन्हेगार ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात अन्...
मी तुझ्या आत्याचा मुलगा बोलत आहे, असे म्हणाला अन्...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...