ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीला राजस्थानमधून अटक

समोरील व्यक्तीने आपले नाव किसन मोरे (रा. खेड, जि. पुणे) असे सांगितले. वाहनांची छायाचित्रे गायकवाड यांना व्हॉट्सऍपद्वारे पाठवली असता गायकवाड यांनी सौदा पक्का केला.

उस्मानाबाद : जुनी मोटारसायकल व स्कूटर विक्रीस असल्याची जाहिरात फेसबुकवर देऊन ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीस राजस्थानातून अटक करण्यात उस्मानाबाद सायबर पोलिसांना यश आले आहे. 

तुम्हाला एक लाख रक्कमेचे कर्ज मंजूर झाले आहे...

जुनी मोटारसायकल व स्कूटर विक्रीस असल्याची जाहिरात फेसबुकवर बघून येणेगुर (ता. उमरगा) येथील बालाजी गायकवाड यांनी जाहिरातीत नमूद क्रमांकार 10 ऑगस्ट 2020 रोजी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर समोरील व्यक्तीने आपले नाव किसन मोरे (रा. खेड, जि. पुणे) असे सांगितले. वाहनांची छायाचित्रे गायकवाड यांना व्हॉट्सऍपद्वारे पाठवली असता गायकवाड यांनी सौदा पक्का केला. 

पोलिस निरीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...

समोरील व्यक्तीने या वाहन विक्री पोटी आगाऊ रक्कम 5,000 रुपये सांगीतलेल्या बँक खात्‍यात भरण्यास सांगीतले. गायकवाड यांनी युपीआय प्रणालीद्वारे तशी रक्कम भरली. त्यानंतर 16 ऑगस्ट 2020 रोजी समोरील व्यक्तीने गायकवाड यांना फोन करुन आपण दोन्ही वाहनांचा ताबा देण्यास येणेगूरपर्यंत आलो असून, उर्वरीत 1,07,350 रुपये रक्कम दिलेल्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. अशा प्रकारे समोरील व्यक्तीने गायकवाड यांच्याकडून रक्कम उकळून आपला भ्रमणध्वनी कायमचा बंद केला.

जुनी नाणी आणि नोटांच्या खरेदी-विक्री बाबत अलर्ट जारी...

आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी उमरगा पो.ठा. येथे गु.र.क्र. 426 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. नमूद तपास उस्मानाबाद सायबर पोलिस ठाण्यास हस्तांतरीत करण्यात आला असता सायबर पो.ठा. च्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील यांच्यासह पथकाने तांत्रीक विश्लेषन करुन प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे उमरगा पो.ठा. च्या पोउपनि- श्री. दांडे, पोहेकॉ- संजय शिंदे, पोशि- म्हेत्रे यांचे पथक राजस्थानात रवाना झाले होते. पथकाने 14 ऑगस्ट 2021 रोजी राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातून आरोपी मोहंमद नेकू खान यास अटक करुन सायबर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. सायबर पोलिस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

इंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱयास बिहारमधून अटक

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: cyber crime news osmanabad police arrested from rajasthan bi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे