फेसबुकवर चॅटींगच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढायची अन् पुढे...
फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. महिला नाव बदलून फेसबुकवर चॅटींगच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचीमुंबईः फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. महिला नाव बदलून फेसबुकवर चॅटींगच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि भेटायला बोलावून त्यांच्याकडील लाखो रुपयांचा ऐवज लांबवायची.
एका व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी तपास करून महिलेसह तीच्या साथीदाराला गोव्यातून अटक केली आहे. महिलेने १० ते १२ जणांना फेसबुकवर प्रेमाचा बहाणा करीत लुबाडल्याचे तपासात समोर आले आहे. समृध्दी खडपकर आणि तीचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा यांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एका केबल व्यावसायिकाला फेसबुकवर संस्कृती खेरमनकर नावाने फ्रेंड रिकवेस्ट आली. ती अॅक्स्पेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये मेसेज आणि कॉल ही झाले. २१ डिसेंबरला व्यावसायिकाने महिलेला बदलापूर पाईपलाईन रोडवर खोणी येथील एका हॉटेलवर रूममध्ये जेवण करण्यासाठी बोलावले होते. रात्री ११.३० वाजता लघुशंका आल्याने व्यावसायिक वॉशरूमला गेला असता महिलेने त्याचा मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन घडयाळ आणि त्याचे परवानाधारक रिव्हॉल्वर असा ४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल चोरून पळ काढला होता. यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, पोलिस हवालदार सुशांत तांबे, सुनिल पवार, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, विकास माळी, पोलिस नाईक शांताराम कसबे, यलप्पा पाटील, देवा पवार, प्रविण किनरे, पोलिस शिपाई बालाजी गरुड, महिला पोलिस हवालदार अरुणा चव्हाण, महिला पोलिस नाईक प्राजक्ता खैरनार यांचे पथक नेमले गेले होते.
पोलिसांनी तपासात तीने फेसबुकवर बोगस नाव टाकल्याचे उघड झाले. तीचे नाव समृध्दी खडपकर असे असून ती खारमध्ये राहते आणि तीच्याविरोधात डोंबिवली लोहमार्ग आणि ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली. तीच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता ती गोव्याला गेल्याचे समजले. तिला गोवा, बारदेज जिल्ह्यातील पेड म्हापसा येथून २८ डिसेंबरला अटक करण्यात पथकाला यश आले. तत्पुर्वी २६ डिसेंबरला तीचा साथीदार विलेंडरला ताब्यात घेण्यात आले.
सोन्याचे दागिने, मोबाईल, फोन अशा वस्तू चोरी करून समृध्दी पळून जायची. बदनामीच्या भितीने लोक तक्रार करीत नसल्याचे पाहून तीचे मनोबल वाढले होते. तीने अशा पध्दतीने १० ते १२ जणांना गंडा घातला होता. गोव्यात राहणारा तीचा सहकारी विलेंडर तीने चोरलेल्या वस्तू बाजारात स्वस्तात विकायचा. दोघा आरोपींकडून १६ मोबाईल फोन, १ रिव्हॉल्वर, सहा जिवंत काडतुसे, दोन घडयाळे, २९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. एखाद्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडील ऐवज चोरल्यावर ती थेट गोव्यात जायची. त्यावेळी ती लीना खडपकर या नावाने विमानाने प्रवास करायची अशीही माहिती तपासात उघड झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महिला व्हिडिओ कॉलवर झाली नग्न आणि पुढे घडलं भयानक...
ऑनलाईन सेक्सटॉर्शन! पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आवळल्या आरोपीच्या मुसक्या...
पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...
स्वारगेट पोलिसांनी 'यु ट्यूब'वरील बंटी-बबलीला गुजरातमधून केली अटक...
हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...
सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...
बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...
Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस
मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...
वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...
आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...