हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...

कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलत असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती मिळवली.

मुंबई: बँक खात्याची KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने डेबिट कार्डची माहिती आणि मोबाईलवर आलेले OTP घेत खात्यातून रक्कम लंपास केली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

राधा (वय ७२, रा. चुनाभट्टी) या एका फार्मास्यूटिकल कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे कॅनरा बँकेच्या शाखांमध्ये तीन स्वतंत्र बचत खाती आहेत. मार्च महिन्यात चूनाभट्टी येथील कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलत असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती मिळवली. मोबाईलवर आलेले ओटीपी घेत खात्यातून तीन व्यवहार करत दीड लाख काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. चुनाभट्टी पोलिसांनी भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल केला होता.

राधा या ७ सप्टेंबर रोजी बचत खात्यांच्या पासबुकमध्ये नोंदी करून घेण्यासाठी गेल्या. त्यांनी पासबुक तपासली असता तिन्ही बचत खात्यातून अज्ञात व्यक्तीने तिन्ही खात्यातून गैरव्यवहार करत एकूण ०३ लाख २५ हजार २२९ रुपये लंपास केले आहेत. याबाबतची माहिती समजताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. चुनाभट्टी पोलिस ठाण्यात पुन्हा तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: cyber crime news chunabhatti police register complaint again
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे