पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

सोशल मीडियावर यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने 'सेक्स तंत्र' या नावाने तीन दिवसांचा एक कोर्स आयोजित करण्यात आल्याची जाहिरात व्हायरल झाली आहे.

पुणे : सोशल मीडियावर यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने 'सेक्स तंत्र' या नावाने तीन दिवसांचा एक कोर्स आयोजित करण्यात आल्याची जाहिरात व्हायरल झाली आहे. 1, 2 आणि 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात हा कोर्स आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचा शोध पुणे सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.

यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचा सेक्स तंत्र या नावाच्या एका कोर्सचे आयोजन करण्यात आल्याचे या जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे. या कोर्समधे सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून तीन दिवसांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये आकारले जाणार आहेत.
'सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन' या संस्थेतर्फे या कोर्सचे आयोजन करण्यात आले असल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. या जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोड देखील देण्यात आला असून, ज्याद्वारे आयोजकांशी संपर्क साधता येणार आहे.

कोर्समधे पुढील कोर्स शिकवले जाणार असल्याचे म्हटले आहेः
- वैदिक सेक्स तंत्र
-डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबॉडीमेंट
-चक्र अॅक्टिव्हेशन
-ओशो मेडिटेशन

दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलिस शोधत आहेत. या जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. त्याचबरोबर ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचाही सायबर पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९५वी कारवाई...

हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...

सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: cyber crime news advertise viral pune cyber police searching
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे