'बुल्लीबाई' अ‍ॅपप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई...

मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चोरुन 'बुल्ली बाई' अ‍ॅपवर अपलोड करुन त्यांची बोली लावली जात होती.

मुंबई: मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चोरुन 'बुल्ली बाई' अ‍ॅपवर अपलोड करुन त्यांची बोली लावली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी उत्तराखंड (Uttarakhand) येथील एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. महिला या प्रकरणात मास्टमाईंड असल्याची शक्यता आहे. 

धक्कादायक! आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे पर हजारो में...

मुंबईच्या सायबर पोलिसांनी विशाल कुमार (वय २१) याला बंगळुरु येथून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाचं उत्तराखंड ते बंगळुरु असं मोठं कनेक्शन असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात आरोपींचा मोठा ग्रुप असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस त्या दृष्टीकोनातून तपासही करत आहेत.

धक्कादायक! बाजारात भर दिवसा युवकाला घेरले अन्...

काय आहे बुल्ली बाई प्रकरण?
बुल्ली बाई (Bully bai) गिटहब (GitHub) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते. हे अ‍ॅप उघडताच एका मुस्लिम महिलेचा चेहरा समोर येतो. याला बुल्ली बाई असे नाव देण्यात आले आहे. किंमत टॅगसह मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले आहेत. यासोबतच बुल्लीबाई या ट्विटर हँडलवरूनही त्याचा प्रचार केला जात आहे. या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांना बुक करता येईल, असे ट्विटर हँडलवर लिहिले आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकास पोलिस कोठडी...

बुल्ली बाई अ‍ॅप (Bully bai App) प्रकरणी पोलिसांनी विशाल कुमार अटक केली असून, तो सिव्हील इंजीनियरिंगचं शिक्षण घेतोय. या प्रकरणात तो एकटा आरोपी नाही, तर त्यांचा एक ग्रुपच असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विशेष संबंधित अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी किंवा मास्टमाईंड ही उत्तराखंड राज्यातील एक महिला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: cyber crime bully bai app case 21 year old accused vishal ku
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे