धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

एका बारावीच्या विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी स्नॅप चॅटवर एका युवकासोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले होते.

नागपूर: नागपूरमधील एका बारावीच्या विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी स्नॅप चॅटवर (SnapChat) एका युवकासोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले होते. यानंतर मुलीने आपले न्यूड व्हिडिओ प्रियकराला पाठवले. यानंतर संबंधित युवकाने पीडित मुलीला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली.

हृदयद्रावक! नवविवाहित जोडपे खोलीत झोपायला गेले अन्...

आरोपीने संबंधित व्हिडिओ पीडितेच्या जवळच्या व्यक्तीला पाठवून तिला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना कळाल्यानंतर युवतीने मानकापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी मानकापूरमध्ये राहते. वर्षभरापूर्वी तिची ओळख रितिक मिश्रा नावाच्या एका तरुणाशी झाली होती. स्नॅप चॅटवर ओळख झाल्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. यानंतर पीडित मुलीने आरोपी तरुणाला न्यूड व्हिडीओ पाठवले. 

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

दरम्यान, आरोपीने पीडित मुलीला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. यामुळे पीडित मुलीने आरोपीला ब्लॉक केले. यानंतर आरोपीने संबंधित न्यूड व्हिडिओ पीडित मुलीच्या एका नातेवाईकाला पाठवला आणि तिला बोलायला सांग अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील, अशी धमकी दिली. संबंधित नातेवाईकाने हा व्हिडिओ पीडित मुलीला आणि तिच्या आई वडिलांना दाखवला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने मानकापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस तपास करत असून, तो ओडिशा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीडमध्ये एसटीचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू...

Bulli Bai App च्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: cyber crime and nagpur cirme news girl friend video forward
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे