मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन कोसळून 3 जणांचा मृत्यू अन्...

मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चेन्नई (तामिळनाडू) : मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या येथे किलीवेडी गावात ही घटना घडली आहे. किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो भाविका या मेळाव्यात हजर होते. उत्सवादरम्यान, एका क्रेनच्या माध्यमातून मोठा हार आणला होता. तिथे काही तरुण उभे होते. पण, अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली आणि तोल जाऊन क्रेन खाली आदळली. अचानक क्रेन कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

क्रेनखाली दबून ज्योती बाबू या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. किलावथम भूपालन आणि मजूर मुठ (42) या मजुराचाही क्रेनखाली दबून मृत्यू झाला. या अपघातात एका मुलीसह ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोनम शासकीय रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

विमानातून जिवलग मित्रांनी आयुष्याचा शेवटचा व्हिडीओ शुट केला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: crane crashed in temple fest 3 dead in near nemili arakonam
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे