लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार आज बैठक झाली. या बैठकीत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला काय उपाययोजना कराव्या यावर चर्चा झाली.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी काय करावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे.

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; पाहा नियमावली...

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 'उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार आज बैठक झाली. या बैठकीत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला काय उपाययोजना कराव्या यावर चर्चा झाली. आकडेवारी पाहिली तर तीन दिवसांत रु्गण संख्या दुप्पट होणारी आहे. निश्चितच ही चिंता वाढवणारी बाब आहे. पण यात चांगली बाब असी आहे की, संख्या वाढत असली तरी 90 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. संख्या वाढत असली तरी 90 टक्के लोकांना लक्षण नाहीत. केवळ 10 टक्के लोकांचं लक्षण आहेत. लसीकरण झालेले सुद्धा बाधित होतात पण त्याची तीव्रता आजिबात नाही. त्यामुळे लसीकरण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लसीकरण करणे गरजेचे आहे. सर्व हेल्थ वर्कर्सचा बुस्टर डोस सध्या शासकीय रुग्णालयात देण्याचा निर्णय होता पण आता आम्ही बुस्टर डोसची सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.'

महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी; पाहा निर्बंध

क्वारंटाईनचा कालावधी किती?
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, RTPCR ऐवजी अँटीजन टेस्ट करण्यावर अधिक भर देण्यात येईल. अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा आरटीपीसीआर करण्याची गरज नाही. केमिस्टमधील कर्मचाऱ्यांनी अँटीजन टेस्टसाठीच्या किटच्या विक्रीची नोंद ठेवणे. क्वारंटाईनचा कालावधी 5 दिवस, 7 दिवस की 14 दिवस असा प्रश्न होता पण आता क्वॉरंटाईनचा कालावधी हा 7 दिवसांचा असणार आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

देशासह महाराष्ट्रात Omicron झपाट्याने वाढतोय...

100 टक्के बंद करण्याची आवश्यकता नाही
कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आज 25 हजारांवर तर उद्या 30 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. 100 टक्के बंद करण्याची आवश्यकता आज तरी नाहीये. ज्या अत्यावश्यक गोष्टी नाहीत, त्या थांबवण्याची गरज. कोरोनाला आळा घालणे म्हणजे गर्दी रोखणे. या संदर्भात मुख्यमंत्री यांना माहिती दिली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा...

70 आमदार, 15 मंत्री पॉझिटिव्ह
राज्यातील जवळपास 70 आमदार आणि 10 ते 15 मंत्री पॉझिटिव्ह आहेत. या सर्व आमदार-मंत्र्यांना खबरदारीचे उपाय घेण्यास सांगितले आहे, असे सांगतानाच जे नियम आहेत त्यांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: corona cases increasing in maharashtra but health minister g
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे