खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन; नेते रडले...

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे: काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने आज (रविवार) निधन झाले आहे. सातव यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

राजीव सातव हे कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता.. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला झाल्यानं प्रकृती गंभीर झाली होती. एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती तसंच कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती. सायटोमॅगीलोनं ग्रासल्याने त्यांचे निधन झाले.

'काँग्रेस पक्षाचे कधीही भरुन न येणारं नुकसान झाले आहे. राजकारणातला देवमाणूस गेला', अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार यांना गहिवरुन आले. ते बोलता बोलता रडायला लागले.

'राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असं त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचं मार्गदर्शन लाभायचं. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला', असं सांगत असताना वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

पुणे शहरात घरपोच देवगड आंबा हवा असल्यास 9511 827050 व्हॉट्सऍपवर क्रमांकावर संपर्क करा.

Title: congress mp rajiv satav passed away due to covid 19 in pune
प्रतिक्रिया (1)
 
Rajiv satav ek abhyasu vyaktimatvakalne tyana aaplyatun hiravun nele parmeshwar tyanchya atmyas sadgati devo hich prarthana
Posted on 16 May, 2021

Rajiv satav amar rahe

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे