बापरे! ग्रामसेविका तोपर्यंत 80 टक्के भाजल्या होत्या...

महिला ग्रामसेविकेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये 80 टक्के भाजल्याने उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादारम्यान मृत्यू झाला.

चिपळूण (रत्नागिरी): शहरातील वाणीआळी येथे राहणार्‍या महिला ग्रामसेविकेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये 80 टक्के भाजल्याने उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादारम्यान मृत्यू झाला. वासंती संजय पाटील (वय 30, मूळ रा. नंदूरबार) असे या मृत ग्रामसेविकेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

पोलिसांनी जखमी अवस्थेतही चौघांना पाठलाग करून पकडलेच...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील तळसर येथे वासंती पाटील ग्रामसेविका म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी (ता. 20) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अंगावरील कपडे पेटल्यानंतर त्या दुसर्‍या मजल्यावरून धावत खोलीच्या बाहेर येत पहिल्या मजल्यावर आल्या. या वेळी इमारतीमधील रहिवासी घाबरले. मात्र, काहींनी तत्काळ त्यांच्या अंगावर पाणी ओतून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत त्या 80 टक्के भाजल्या होत्या. 

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर गंभीर आरोप

वासंती पाटील यांना तत्काळ लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारार्थ त्यांना ऐरोली नवी मुंबई येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी ग्रामसेवक संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस फौजदार प्रकाश शिंदे यांनी या घटनेचा पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

चाकण येथील ATM चोरीचे CCTV फुटेज आले समोर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: chiplun crime news gramsevika vasanti patil suicide at wania
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे