जवानाला शोधण्यास पोलिसांना यश; धक्कादायक माहिती समोर...
नक्षलग्रस्त भागात तैनात असलेला सीआरपीएफ जवान एक महिन्यांपासून बेपत्ता होता.रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलग्रस्त भागात तैनात असलेला सीआरपीएफ जवान एक महिन्यांपासून बेपत्ता होता. बेपत्ता असलेल्या सीआरपीएफ जवानाचे रहस्य अखेर पोलिसांनी उलगडले आहे. जवानाच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. जवानाला शोधण्यास पोलिसांना यश मिळाले असून तपासात जवानाने धक्कादायक माहिती दिली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे जवानाने पोलिसांना सांगितले.
निर्मल कटारिया असे बेपत्ता सीआरपीएचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जवानाची पत्नी त्याला मारहाण तसेच शिवीगाळ करत होती. पत्नीच्या या रोजच्या जाचाला कंटाळून घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. जवानाने पोलिसांना आपल्या जबबात सांगितले की, 'पत्नीच्या मारहाणीमुळे मी गेली सहा महिने कामावर देखील गेलो नाही. माझ्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे. तसेच माझी पत्नी माझ्या चारित्र्यावर संशय देखील घेते.'
सीआरपीएफ जवान निर्मल कटारिया पत्नी आणि चार वर्षाच्या मुलासह जगदलपूर येथील शांतीनगर येथे एका भाड्याच्या घरात राहतो. काही दिवसापूर्वी निर्मलची पत्नी हिनाने पती बेपत्ता असल्याची माहिती पत्रकारांना दिली होती. तसेच सीआरपीएफचे अधिकारी माझ्या पतीला शोधण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पत्नी हिनाने बस्तरचे आयजी सुंदरराप पी यांच्याकडे मदत मागितली. सीआरपीएफ जवान निर्मल कटारियाच्या अचानक अचानक गायब झाल्यामुळे सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये गोंधळ उडाला होता. बोधघाट ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर एसपीच्या आदेशानंतर एक टीम बनवण्यात आली. अखेर या टीमला महिन्याभरानंतर यश मिळाले. मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये जवान सापडला. परत आल्यानंतर जवानाने पत्रकारांशी संवाद साधताना मोठे खुलासे केले.
जवानाने सांगितले, 'माझे लव्ह मॅरेज आहे. मला माझ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आहे. अनेकदा मी माझ्या पत्नीला फोनवर बोलताना पकडले आहे. त्यांच्याशी बोलू नको असे म्हटल्यानंतर माझ्या पत्नीने मला मारहाण केली. रोज आमचे या गोष्टीवर भांडण होत असे. मी ड्यूटीवर गेलो तरी माझी पत्नी नाराज होत असे. अधिकाऱ्यांना फोन करायची. या सर्व गोष्टींना कंटाळून मी घर सोडून जाण्याचे नियोजन केले, परंतु पोलिसांनी मल शोधले. तसेच चार वर्षाचा मुलगा हा माझा नाही. त्याच्या डीएनए टेस्टसाठी मी अर्ज देखील केला आहे. मला माझ्या पत्नी आणि मुलासोबत राहायचे नाही. मी पुन्हा कामावर रूजू होणार आहे.' दरम्यान, या सर्व प्रकरानंतर पती- पत्नीमधील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी दोघांचे काऊन्सलिंग देखील करण्यात येणार आहे.
लष्करातून सुट्टीवर आलेल्या जवानाने उचलले धक्कादायक पाऊल...
हृदयद्रावक! जुळ्या मुलांच्या वाढदिवशीच जवान हुतात्मा...
लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; १६ जवान हुतात्मा...
लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; सात जवान हुतात्मा...
लष्करात तीन महिन्यांपूर्वीच दाखल झालेले जवान हुतात्मा...
हिमस्खलनात भारतीय लष्कराच्या 7 जवानांचा मृत्यू; नावे पाहा...
सलाम!15000 फूट उंचीवर -40 डिग्रीत जवानांनी फडकवला तिरंगा...
जवान चंदू चव्हाण यांना ओळखपत्र द्याः न्यायालय
काश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा...
अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा... अथवा बुकगंगा या वेबसाईटवर जाऊन खरेदी करा.