धक्कादायक! कुटुंबातील सात जणांना भरचौकात खांबाला बांधले अन्...

काही दिवसांपूर्वी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी संचारली होती. गावातील दलित समाजातील 8 ते 10 वयोवृद्ध पुरुष आणि महिलांनी गावावर भानामती केल्याचे देवी संचारलेल्या महिलांनी सांगितले.

चंद्रपूर : भानामती केल्याच्या संशयातून येथील एका दलित कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी दलित कुटुंबातील सात जणांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण केली. यामध्ये सातही जण जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. संबंधित पाच गंभीर जखमींना चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बापरे! टोळीने जमीन मालकाची कशी फसवणूक केली पाहाच...

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात माणुसकीला कलंकित करणारी ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी संचारली होती. गावातील दलित समाजातील 8 ते 10 वयोवृद्ध पुरुष आणि महिलांनी गावावर भानामती केल्याचे देवी संचारलेल्या महिलांनी सांगितले. ही बाब समोर येताच गावातील काही जणांनी संबंधित सर्वांना गावातील चौकात आणले. खांबाना सर्वांचे हातपाय बांधत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले आहे.

रांजणगाव पोलीस स्टेशनचा दंड वसुलीत जिल्ह्यात सातवा क्रमांक...

पारनेर तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणावर अण्णा हजारे म्हणाले...

दरम्यान, मारहाण होत असताना भीतीपोटी गावातील कोणीही मध्ये पडले नाहीत. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात तणावाच वातावरण तयार झाले होते. याबाबत अधिक माहिती देताना गडचांदूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सांगितले, 'वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादूटोणा करत असल्याबाबत संशय होता. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी जाऊन त्यांना सोडविले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.'

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: chandrapur crime news villagers beat dalit family black magi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे