अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची दबंगगिरी...

सततच्या कार्यवाहीने दणाणले अवैध धंदे करणार्यांचे धाबे

अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची दबंगगिरी कामगिरीमुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

चंद्रपूर: भद्रावती पोलिस स्टेशनचे हद्दीत छापा टाकून ३ लाख ६० हजार रुपयांचा दारुसाठा केला जप्त केला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची दबंगगिरी कामगिरीमुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

तू तुझे मोबाईलमध्ये मुलींचे फोटो का काढले? असे म्हणून...

सवीस्तर वृत्त असे की, दारुबंदी हटविण्याचा आदेश धडकून फक्त १ आठवडा झाला तरी अवैधरित्या विनापरवाना दारु विकणार्याचे जैसे थे याच अनुषंगाने करण्यात येणाऱया लागोपाठ कारवाया याची अवैध धंदे करणार्यांना सळो की पळो करुन सोडणारे नवनियुक्त अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या दबंगगिरी कामगिरीमुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

संघटीतपणे गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणाऱयांवर कारवाई

अतुल कुलकर्णी यांनी अल्प कालावधीतच खबरीचे नेटवर्क जनसंपर्कातून तयार केले आहे. खबरीचे माध्यमातून मिळालेल्या खात्रीशीर बातमी नुसार भद्रावती पोलिस स्टेशनचे हद्दीत शास्त्रीनगर परीसरात काही लोकांनी अवैधरित्या दारुचा साठा विक्रीसाठी ठेवल्याच्या बातमीवरुन अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने उपविभागिय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते.

Video: अनलॉकनंतर महामार्गावर झाली वाहतूक कोंडी...

पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या व सदर ठिकाणी छापा टाकला असता ३६ खरड्याचे बॅाक्स मध्ये १०० प्रमाणे रॉकेट कंपनीच्या १८० मिली च्या देशी दारुच्या ३६०० बॅाटल अंदाजे किंमत ३६०००० रुपयांच्या घराच्या कंपाऊंड मधे विक्री करीता लपून ठेवल्या होत्या. त्याबाबत चौकशी केली असता सदरचा साठा हा अक्षय मन्ने, प्रवीन कठारे, सुरज आगरे यांचा असल्याचे कळताच त्यांना शिताफिने अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यांत वापरलेला मोबाईल व मुदेमाल असा एकूण ३९१००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा: मुख्यमंत्री

सदरची कार्यवाही अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेशाने उपविभागिय पोलिस अधिकारी निलेश पांडे, पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पोलिस शिपाई केशव विटगिरे, निकेश ठेंगे, हेमराज प्रधान यांनी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अनलॉकबाबत नियमावली जाहीर, कोणता जिल्हा कधी पाहा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: chandrapur crime news police officer atul kulkarni action on
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे