करुणा शर्मा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ...
शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांच्यासह अन्य एकावर, फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून परळी शहर पोलिस ठाण्यामध्ये आणि केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड : शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांच्यासह अन्य एकावर, फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून परळी शहर पोलिस ठाण्यामध्ये आणि केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
करुणा शर्मा यांनी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असणाऱ्या बालाजी दहिफळे यांच्या विरोधात शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांनी देखील परळी पोलिस ठाण्यामध्ये शर्मा यांच्या विरोधात धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी करुणा शर्मा यांच्यासह, अजय देडे यांच्यावर परळी पोलिस ठाण्यामध्ये कलम 507, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 'करुणा शर्मा यांनी जे आरोप केले आहेत, ते आरोप खोटे आहेत. जर ते आरोप खरे असतील, त्याचा पुरावा शर्मा यांच्याकडे असेल, तर मला भर चौकात फाशी द्या मात्र माझ्याकडे त्यांनी दिलेल्या धमकीचे, शिवीगाळीचे पुरावे आहेत. ते मी पोलिस अधीक्षकांना देणार आहे' असे म्हणत बालाजी दहिफळे यांनी फेसबुक पोस्ट करत, शर्मा यांनी खुले आव्हान दिले आहे.
करुणा शर्मा यांच्या विरोधात लाखो रुपये घेतल्याचा आरोप; गुन्हा दाखल
करुणा शर्मा यांच्या गाडीजवळ स्कार्फ बांधून आलेली महिला कोण?
'करुणा धनंजय मुंडे': एक प्रेम कथा लवकरच...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.