मॉडेलला बंगल्यात बोलावून तिचे अश्लील व्हिडीओ शूट

वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत मॉडेलचे अश्लील व्हिडीओ चित्रीत केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मुंबई: पीडित तरुणी व्यवसायाने मॉडेल आहे.वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत   मॉडेलचे अश्लील व्हिडीओ चित्रीत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दिग्दर्शक आणि त्याच्या अन्य साथीदारांनी मॉडेलला एका बंगल्यात बोलावून तिचे अश्लील व्हिडीओ शूट केले आहेत. यानंतर आरोपींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  करत संबंधित मॉडेलची बदनामी केली आहे. या प्रकरणी पीडित मॉडेलनं मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  केला आहे. 

लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी पडले प्रेमात अन् केला विवाह...

 तिने काही काळ मॉडेलिंगमध्ये काम केल्यानंतर, आता ती बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. दरम्यान दिग्दर्शक असलेल्या एका व्यक्तीने तिला फोन केला आणि आपण एक वेब सीरीज चित्रीत करत असल्याचं तिला सांगितलं. त्याचबरोबर वेब सीरीजमध्ये मुख्य नायिकेची भूमिका देण्याच आमिष दिग्दर्शकाने तिला दाखवलं. कामाच्या शोधात असणाऱ्या मॉडेलला समोरून ऑफर आल्यामुळे तिनेही त्वरित होकार कळवला. दरम्यान दिग्दर्शकाने तिला एका मालवणी परिसरातील एका बंगल्यात बोलवलं.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात अऩ्...

याठिकाणी दिग्दर्शकासोबत अन्य तीन लोकं आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी वेब सीरीजच्या नावाखाली पीडित मॉडेलचे काही अश्लील व्हिडीओ चित्रीत केले. यानंतर आरोपींनी हा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर 'जीजा का पिझ्झा' या नावाने अपलोड केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर धक्का बसलेल्या तरुणीने त्वरित मालवणी पोलिसांत जाऊन लेखी तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिग्दर्शकासोबत अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रेमीयुगलाने लॉकडाऊनमुळे हाल होत असल्याचे पोलिसांना सांगितले अन्...

मालवणी पोलिसांनी अद्याप कोणलाही अटक केली नसून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यापूर्वीही मालवणी पोलिसांत अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. लवकरच आरोपींना गजाआड केलं जाईल, असं आश्वासनंही पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Call the model to the bungalow and shoot her porn video
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे