मेव्हणीच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यावर दाजीने उचलले मोठे पाऊल...

एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी एकमेकांना भेटत होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या नातेवाईकांना समजली होती.

गोरखपूर (उत्तर प्रदेश): मेव्हणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या दाजीला समजल्यापासून तो नाराज होता. प्रियकरावर पाळत ठेवून दोघा मित्रांच्या मदतीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अजब प्रेम की गजब कहानी; लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन्...

गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव पोलिस चौकीच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनइचा या गावामध्ये असलेल्या एका मेडिकलच्या दुकानात सत्यजीत नावाचा युवक काम करत होता. जगदीशपूर गावामधील एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी एकमेकांना भेटत होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या नातेवाईकांना समजली होती. तिच्या दाजीने सत्यजीतवर पाळत ठेवली होती. सत्यजीत मेडिकलमधून बाहेर पडल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला होता. युवतीच्या दाजीने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने त्याला रस्त्यात अडवले. तिघांनी मिळून त्याला मारहाण करून चाकूने वार केले.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी पडले प्रेमात अन् केला विवाह...

दरम्यान, सत्यजीत गंभीर जखमी झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडला होता. यानंतर हल्ला करणारे तिघेही पळून गेले होते. नागरिकांनी सत्यजीतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सत्यजीतच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात अऩ्...

पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी सुरू केली. यावेळी प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेमीयुगलाने लॉकडाऊनमुळे हाल होत असल्याचे पोलिसांना सांगितले अन्...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: brother in law got angry with sister in law love affair atta
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे