धक्कादायक! नवरीचा प्रियकर आणि नवरदेव एकमेकांना भेटले अन्...

लग्नाच्या एक दिवस अगोदर नवरदेव आणि नवरीचा प्रियकर एकमेकांना भटले.

भोपाळ (मध्य प्रदेश): लग्नाच्या एक दिवस अगोदर नवरदेव आणि नवरीचा प्रियकर एकमेकांना भटले. यावेळी दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर नवरदेवाने प्रियकरावर गोळी झाडली आणि दुसऱया दिवशी विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक! राज कुंद्राने मलाही ऑफर दिली होती...

मध्य प्रदेशातील श्योपुरनजीक असणाऱ्या पांडोला या गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पांडोला गावातील रहिवासी असणाऱ्या पवन नावाच्या तरुणाचा गावातील एका तरुणीसोबत विवाह ठरला होता. पण लग्न ठरलेल्या मुलीचं कुलवीर ऊर्फ जसवीर (वय 23) नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध सुरू होते. प्रेयसीचे लग्न ठरले असूनही प्रियकर तिचा पिच्छा करत होता. याची माहिती नवरदेव पवनला मिळाली. त्यामुळे त्यानं होणाऱ्या बायकोच्या प्रियकराला भेटायला बोलवले. यानंतर पवनने कुलवीरला आपल्या होणाऱ्या बायकोचा पिच्छा सोडायची विनंती केली. तसेच मंगळवारी आपले लग्न होणार आहे. लग्नात बाधा ठरू नको, असे सांगतिले. पण संबंधित मुलगी आपल्यावर प्रेम करते. तू तिच्याशी जबरदस्तीने विवाह करत असल्याचे कुलवीरने सांगितले. यामुळे संतापलेल्या नवरदेवाने होणाऱ्या बायकोच्या प्रियकरावर गोळी झाडली. या घटनेत प्रियकराच्या कंबरेत गोळी आरपार गेली आहे.

हृदयद्रावक! मी, त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो...

याप्रकरणी प्रियकराने नवरदेव पवनसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून, लग्न झाल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रियकर हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्याविरोधात काही गुन्हेही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तरुणावर मारहाणीसोबतच छेडछाड केल्याचे गुन्हे दाखल आहे. या घटनेचा पुढील तपास पांडोला पोलिस करत आहेत.

धक्कादायक! प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही...

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: brides old lover and groom meet before 1 day of marriage and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे