हनिमूनच्या रात्री जाग आल्यावर नवरदेवाला बसला धक्का...

नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांची खोली हनिमूनसाठी सजविण्यात आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाला जाग आल्यावर धक्का बसला.

कानपूर (उत्तर प्रदेश): नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांची खोली हनिमूनसाठी सजविण्यात आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाला जाग आल्यावर धक्का बसला. नवविवाहिता मधुचंद्राच्याच रात्री रोख आणि दागिने घेऊन फरार झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

दोन मुलांची आई बनली नववधू अन् लग्नाच्या तिसऱया दिवशी...

रसूलाबाद ठाणे क्षेत्र स्थित खेम निवादा गावात राहाणारे धीरज सिंह उर्फ नवाब वडिलांसोबत शेतीचे काम करतात. धीरज सिंहचे लग्न मुंडरवा तहसीलमधील एका गावात शेतकऱ्याच्या मुलीशी ठरले होते. धीरज सिंह २५ जूनला वरात घेऊन गेला होता आणि २७ जूनला नवरीला घेऊन परतला होता. हनिमूनच्या रात्री नवरीने नवऱ्याला दुधात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. दूध प्यायल्यानंतर नवरा मुलगा गाढ झोपला. मध्यरात्री जेव्हा जाग आली त्यावेळी कपाटातील साहित्य विखुरले होते. नवविवाहिता २५ हजार रोख आणि साधारण तीन लाखांचे दागिने घेत फरार झाली होती.

प्रेमविवाहानंतर हनिमूनच्या रात्री खोलीत आढळले बेशुद्धावस्थेत...

धीरजने खोली बाहेर जाऊन कुटुंबियांना पत्नीबबाबत विचारले असता त्यांनाही माहिती नसल्याचे ते म्हणाले. धीरज आणि त्याचे कुटुंबीय या नवरीचा शोध घेत आहेत. तिचा फोनही बंद झाला आहे. धीरजने तिच्या आई-वडिलांकडे याची चौकशी केली तर त्यांनीही माहितीसाठी नकार दिला. धीरजने सांगितले की, मंगळवारी रात्री दोन विविध नंबरवरून कॉल आले होते. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पत्नीचा मामा असल्याचे सांगितले होते. शिवाय, बराच वेळ बोललाही होता. यानंतर पत्नी दूध घेऊन आली आणि दुध प्यायल्यानंतर पती झोप लागली होती. मध्यरात्री जाग आल्यानंतर नवरी फरार झाल्याचे दिसून आले.

हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाला समजली धक्कादायक माहिती...

हनिमूनच्या रात्री नवरा झोपल्यावर नवरीचे कृत्य सीसीटीव्हीत कैद...

हनिमूनच्या रात्री नवरीच्या पोटात लागले दुखायला; मग...

हनिमूनच्यावेळी पत्नीचे काढलेले फोटो व्हायरल अन्...

हनिमूनसाठी खोलीत गेल्यावर दोघांची जोरदार हाणामारी...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: bride theft jwellery and money on honeymoon night kanpur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे