मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा झटका...

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत आपल्याला अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ही मागणी करणारी याचिका आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

राज्य सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोन आठवडे स्थगिती देण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्थगिती दिल्यास तपासात हस्तक्षेप केल्या सारखे होईल, असे उच्च न्यायालयाने म्हणत याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमुर्ती एन. जे. जामदार यांनी ही याचिका फेटाळली आहे.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत अनिल देशमुख यांनी म्हटले होते, 'माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय द्वेषाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.'

अनिल देशमुख यांचा दिवाणजी 'इडी'च्या ताब्यात; अडचणीत वाढ...

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत आपल्याला अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या या आरोपांनंतर सीबीआयने त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दाखल केलेला हा गुन्हा मागे घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची ही याचिका फेटाळली आहे. अनिल देशमुख यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा मोठा दणका...

'ईडी'च्या तिसऱया समन्सनंतर अनिल देशमुख यांचे उत्तर...

अनिल देशमुख यांच्या दोन साथीदारांना १ जुलैपर्यंत ईडी कोठडी

'ईडी'ची चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठीः शरद पवार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

अनिल देशमुख यांच्या घरी 'ईडी'चा छापा; वळसे पाटील म्हणाले...

अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर 'ईडी'ची धाड

अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आणि...

अनिल देशमुख यांचा सीबीआय चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

'सत्यमेव जयते' म्हणत अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: bombay hc refuses to quash cbi fir against anil deshmukh in
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे