धक्कादायक! खासदार शारिरीक संबंधासाठी अनेकदा यायचा...

गेल्या वर्षी पहिल्यांदा पार्टी कार्यालयात प्रिन्स राज यांना भेटले होते. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. पुढे अनेकदा पार्टीच्या कामानिमित्त एकमेकांना भेटले होते.

नवी दिल्ली : बिहारमधील समस्तीपूर येथील लोक जनशक्ती पार्टीचे खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात एका युवतीने गुन्हा दाखल केला आहे.  प्रिन्स राज शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेकदा रात्री-अपरात्री घरी यायचा, असेही पीडित युवतीने तक्रारीत म्हटले आहे.

धक्कादायक! पुणे शहरात प्रेयसीचा सपासप वार करून खून...

युवतीने दिलेल्या तक्रारीमध्ये एलजेपीचे नेते चिराग पासवान यांचेही नाव आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी आणि चुलत भाऊ प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात कारवाईला उशीर केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप चिराग पासवान यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. 

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

(file photo)

धक्कादायक! पुण्यातील सामूहिक बलात्काराबाबत नवी माहिती समोर...

पीडितेची वकील सुदेश कुमारी जेठवा यांनी सांगितले की, 'आम्ही मे महिन्यात दिल्ली पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दिल्ली न्यायालयात याबाबत अर्ज करण्यात आला होता. यानंतर दिल्ली न्यायालयाने खासदार प्रिन्स राज आणि त्यांचा चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.' 10 फेब्रुवारी 2021 रोजी प्रिन्स राज यांनी फिर्यादी तरुणीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी प्रिन्स राज म्हणाले होते की, 'एका महिलेनं माझ्याविरोधात काही आरोप केल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मी 10 फेब्रुवारी रोजीच तक्रार दाखल केली होती. तसेच पोलिसांसमोर सर्व पुरावे सादर केले होते.'

धक्कादायक! बॅंक मॅनेजरचा मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत...

पीडित युवतीने तक्रारीत म्हटले आहे की, 'गेल्या वर्षी पहिल्यांदा पार्टी कार्यालयात प्रिन्स राज यांना भेटले होते. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. पुढे अनेकदा पार्टीच्या कामानिमित्त एकमेकांना भेटले होते. पण, एका मिटींगमध्ये पीडितेनं पाणी पिण्यासाठी टेबलवरील बाटली घेतली. तेव्हा संशयित आरोपी प्रिन्स राज यांनी तुला दुसरे पाणी देतो, असं म्हणत ग्लासमध्ये वेगळे पाणी दिले. हे पाणी प्यायल्यानंतर बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपीने बलात्कार करत व्हिडीओ बनवला. या घटनेनंतर पीडित युवतीने लोक जनशक्ती पार्टीतून राजीनामा दिला होता. त्यानंतरही संशयित आरोपी प्रिन्स राज पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेकदा रात्री-अपरात्री घरी यायचा.'

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: bihar crime news fir lodged against ljp mp prince raj and ch
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे