माणूसकीला काळीमा! चिमुकलीवर बलात्कार करून काढले डोळे...

गावाबाहेर एका झाडाखाली मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.

पाटणा (बिहार): मुंगेर जिल्ह्यातील सफिया सराय पोलिस ठाणे क्षेत्रात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचे दोन्ही डोळे काढले आणि बोटे ठेचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संतापजनक! बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड...

संबंधित घटना 4 ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. पीडित चिमुकलीचे वडील मासे पकडण्यासाठी गंगा घाटावर गेले होते. चिमुकलीसुद्धा वडिलांसोबत गेली होती. काही वेळानंतर वडिलांनी चिमुकलीला घरी जाण्यास सांगितले आणि ते नदीत उतरले. पण, मुलगी घरी पोहोचलीच नाही. मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी मुलीविषयी चौकशी केली. पण, मुलगी घरी आलीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीचा शोध सुरु केला.

धक्कादायक! नर्सचा ड्रेस घालून रुग्णालयात आली अन्...

पीडित मुलीचा रात्रभर शोध घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी सकाळी गावाबाहेर एका झाडाखाली मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक SIT पथक स्थापन करण्यात आले आहे.

धक्कादायक! पुण्यातील सामूहिक बलात्काराबाबत नवी माहिती समोर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: bihar crime news eight year girl tourcher and her eyes broke
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे