वऱ्हाडी नाचत असतानाच नवरीने प्रियकरासोबत ठोकली धूम...

नवरी फरार झाल्याची माहिती नवरदेवाला समजताच एकच गोंधळ उडाला.

पाटणा (बिहार): नवरदेव आणि नवरी दोन्हीकडील पाहुणे विवाह सोहळ्याच्या आनंदात मग्न असताना नवरीने चेहरा धुवायला जात असल्याचे सांगून प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना जमुई येथे घडली आहे. संबंधित घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

नवरी फरार झाल्याची माहिती नवरदेवाला समजताच एकच गोंधळ उडाला. झारखंडहून आलेल्या वरातीला निराश होऊन परतावे लागले. यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रियकराच्या आईला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलं. लवकरच दोघांनाही पकडलं जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

गावामध्ये 13 मार्च रोजी होणार होते. मात्र काही कारणास्तव तारीख बदलून 14 मार्च करण्यात आली. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. रात्री 11 च्या सुमारास झारखंडमधील देवघर येथून ही वरात संथाली गावात पोहोचली. दोन्ही कुटुंबात उत्साहाचं वातावरण होतं. डीजेवर वरातीतील लोक जोरदार नाचत होते आणि वरातीतील पाहुण्यांच्या स्वागतासाठी वधू पक्ष सज्ज होता.

विवाह सोहळ्यादरम्यान उत्साहाचे वातावरण असताना अचानक मुलीच्या बाजूकडील लोकांना समजलं की, नातेसंबंधाने भाऊच लागणारा अरविंद यादव त्यांच्या मुलीला घेऊन पळून गेला आहे. नातेवाईकांनी वधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. दोघांच्या प्रेमप्रकरणावरून दोन्ही कुटुंबात यापूर्वी वाद झाला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले होते. मात्र, परस्पर संमतीने प्रकरण मागे घेण्यात आले. पण लग्नाच्या दिवशी दोघेही फरार होतील याची कोणालाच कल्पना नव्हती. ऐन लग्नाच्या दिवशी नवरी पळून गेल्यामुळे नवरदेवाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवरीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सीसीटीव्ही पाहून कुटुंबियांना धक्का...

नवरीने प्रियकरासोबत ऐनवेळी ठोकली धूम; नवरदेवाची विचित्र मागणी...

नवरीने लग्नाच्या एक दिवस अगोदर नको ते केले अन्...

महिलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहून पोलिसांना बसला धक्का...

धक्कादायक! पत्नींना झोपेची गोळी देऊन त्यांनी केली अदलाबदल...

बापरे! हजारो जोडप्याचे अश्लील व्हिडिओ शूट केले अन्...

बॉयफ्रेंड समजून केले चॅटिंग अन् प्रत्यक्ष भेटल्यावर बसला धक्का...

दोघांचे एकमेकींच्या पत्नीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे...

Video: जिममध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी...

वयाच्या ५६व्या वर्षी केला पाचवा विवाह; कारण...

अजब प्रेम! प्रियकर ६० वर्षांचा अन् २० वर्षांची प्रेयसी...

Video: १५ बायका १०७ मुले; लग्न करतच राहणार...

दोन मैत्रिणींनी एकाच युवकासोबत केलं लग्न; कारण...

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: bihar crime news bride run away with boy friend groom regist
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे