भंडारा येथे डॉक्टर पुत्रासह सहा दरोडेखोरांना शिताफीने पकडले...

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने वलमाझरी फाट्यावर अटक केली आहे.

भंडारा: एका डॉक्टराच्या मुलाने दुसऱ्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोडा टाकण्याचा कट आखला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट फिस्कटला असून, डॉक्टर पुत्रासह सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये ही घटना घडली आहे. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने वलमाझरी फाट्यावर अटक केली आहे. या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद डोंगरवार असे या डॉक्टर पुत्राचे नाव आहे. अरविंदसह सूरज जयस्वाल, मिलिंद गजभिये, रामेश्वर वाढई , कोमल बनकर अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. 

धुळे पोलिसांनी पाठलाग करून थांबवली मोटार; किती तलवारी पाहा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी फोन द्वारे मिळाली होती. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटार सायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तपासले असता त्यांच्याजवळ लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली. आरोपींना ताब्यात घेतले असताना साकोली तालुक्यातील आमगाव येथील डॉ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले.

बापरे! तब्बल 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त...

भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. आरोपींमध्ये साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला करणारा कारेगावात जेरबंद

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: bhandara crime news doctor son and other five arrested for r
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे