अनोळखी व्यक्तीसोबत इंटरनेटवरून मैत्री केली अन्...

अमेरिकेतून दीड लाख डॉलर आणल्याचे सांगून त्याच्यावर कस्टम विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची भीती दाखवून इंजिनीअरला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल १३ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले.

नवी मुंबई: इंटरनेटवरून अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ऐरोली सेक्टर ३मधील एका टेक्सटाईल इंजिनीअरला चांगलेच महागात पडले आहे. या इंजिनीअरने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत इंटरनेटवरून मैत्री केली, त्या व्यक्तीने अमेरिकेतून दीड लाख डॉलर आणल्याचे सांगून त्याच्यावर कस्टम विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची भीती दाखवून इंजिनीअरला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल १३ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांमुळे अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत...

ही ५७ वर्षीय व्यक्ती गेल्या महिन्यामध्ये मोबाइलवरून प्लॅनेट रोमीओ या वेबसाइटवरून माहिती घेत असताना, त्यांच्या वेबपेजवर डॉ. माईक क्रेग याचा फोटो आल्याने इंजिनीअरने त्याच्यासोबत चॅट करण्यास सुरुवात केली. त्याने अमेरिकेत डॉक्टर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यात नियमितपणे चॅटिंग होऊ लागले. यादरम्यान भामट्याने तो मुंबईत फिरण्यासाठी येत असल्याचे सांगितले.

धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

काही दिवसांतच एका महिलेने एअरपोर्टच्या कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून क्रेग याने दीड लाख यूएस डॉलर आणल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येत असल्याची भीती दाखविली. तसेच, डॉलर भारतीय रुपयांमध्ये परिवर्तित करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काची रक्कम तत्काळ भरावी लागेल, असे सांगितले.क्रेग हा भारतात त्याला भेटण्यासाठी आल्याने त्यालाच ती फी भरावी लागेल अन्यथा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी भीती दाखविली. 

मेव्हणीच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यावर दाजीने उचलले मोठे पाऊल...

त्यामुळे इंजिनीअरने महिलेने पाठविलेल्या बँक खात्यावर एनईएफटीद्वारे ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर महिलेने आणखी दोन लाख ९८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतरही महिलेच्या सांगण्यानुसार इंजिनीअरने वेगवेगळी रक्कम भरत एकूण १३ लाख ५० हजार ८०० रुपये पाठविले. त्यानंतरही आणखी रक्कम पाठविण्यास सांगितल्यानंतर त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Befriended a stranger on the internet and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे