महिला पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; पोलिस दलात हळहळ...
बीड येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या हवालदार माया श्याम जाधव या पेठ बीड ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत होत्या.बीड : मकर संक्रांतीच्या निमित्ताने बीड पोलिस दलातील महिला हवालदार माया श्याम जाधव यांनी मैत्रिणी आणि नातेवाईक महिलांना हळदी कुंकवासाठी घरी बोलावले होते. मात्र, वाणाचे साहित्य खरेदी केल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दुचाकीवर असलेल्या पती-पत्नीला ट्रकने धडक दिल्यामुळे माया श्याम जाधव (वय ४२, मूळ रहिवासी लिंबागणेश, तर हल्ली राहण्याचा पत्ता धांडे नगर) यांचा मृत्यू झाला आहे.
बीड येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या हवालदार माया श्याम जाधव या पेठ बीड ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत होत्या. तर त्यांचे पती श्याम जाधव हे देखील बीडच्या उपाधीक्षक कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. माया जाधव यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जाधव पती पत्नी बीड शहरातील बार्शी नाका परिसरात १६ जानेवारी रोजी खरेदी करण्यासाठी गेले. खरेदी करून बीडच्या बार्शी नाका परिसरामध्ये बिंदुसरा नदीच्या पुलावरुन घरी परतताना एका हायवाने पाठीमागून जोराची धडक दिली. यात जाधव पती पत्नी रस्त्यावर कोसळले. मात्र, माया जाधव यांना डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर श्याम जाधव हे हातावर पडल्याने त्यांचा हात फॅक्चर झाला. गंभीर जखमी झालेल्या माया जाधव यांना तात्काळ औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू झाले. मात्र, शुक्रवारी (ता. २०) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
माया जाधव यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस विभागामधील अनेक अधिकारी अंत्यविधीला उपस्थित होते. मात्र या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईत महिला पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; सेल्फी ठरला अखेरचा...
हृदयद्रावक! महिला पोलिसाच्या डोक्यात बैलाचे शिंग घुसल्याने दुर्देवी मृत्यू
धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या...
पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या...
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसकाकाचा मृत्यू...
हृदयद्रावक! दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या महिला पोलिसाचा मृत्यू...
वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन...
हृदयद्रावक! महिला पोलिस मुलाला उपचारासाठी घेऊन जात असतानाच...
पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसकाका भास्कर मोढवे यांचे हृदयविकाराने निधन
पोलिसकाका सुनील जंगम यांच्या निधनाने बसला धक्का...
पुणे जिल्ह्यात पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप...
नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण समोर...
सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या
इमारतीवरून तोल गेल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.