हृदयद्रावक! बेपत्ता मुलीच्या विरहातून बापाने उचलले धक्कादायक पाऊल...

तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या विरहाने बापाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथे घडली आहे.

बीड : तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या विरहाने बापाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथे घडली आहे. शेख रतन शेख नुरमुहम्मद (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! नवरीचा प्रियकर आणि नवरदेव एकमेकांना भेटले अन्...

सिरसाळा येथील रतन शेख यांच्या मुलीस 8 एप्रिल रोजी अज्ञात आरोपीने पळवून नेले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जनक पुरी यांच्याकडे होता. पंरतु, त्यांची सेवानिवृत्त झाली. यामुळे हा तपास पोलिस उपनिरीक्षक अधिकारी महेश विघ्ने यांच्याकडे गेला. घटना घडल्या पासून मुलीचे वडील रतन शेख व नातेवाईक तपास कुठपर्यंत आला हे विचारण्यासाठी सतत पोलिस स्टेशनला जात होते. तीन महिने झाले तरी मुलीचा तपास न लागल्याने आणि मुलीच्या विरहाने तणावग्रस्त परिस्थितीत रतन शेख यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे नातेवाईकांनी तक्रारीत म्हटले आहे.

धक्कादायक! राज कुंद्राने मलाही ऑफर दिली होती...

दरम्यान, सिरसाळा काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता. माजलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे तात्काळ आले आणि मयताचे नातेवाईक यांच्या भावना व मागणी समजून घेत पळवलेल्या मुली प्रकरणी तपास वेगात करण्यात येईल तोपर्यंत हा तपास सिरसाळा प्रभारी सह पोलिस निरिक्षक एकशिंगे यांच्याकडे सोपावला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

धक्कादायक! प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही...

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: beed crime news daughter missing from 3 months father suicid
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे