अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

पणजी (गोवा): पाकिस्तानने आपल्या कारवायांना आवर घातला नाही, तर पुन्हा एका सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहावे, असा इशारा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची शक्यता आहे.

गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. जम्मू-काश्‍मीरमध्ये काही दिवसांपासून वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. अमित शहा म्हणाले, 'कोणीही आमच्यावर केलेले हल्ले आम्ही खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले किंवा काश्‍मीरमधील आमच्या नागरिकांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईल करू.'

काश्मीरमध्ये जवानांनी घेतला बदला; दहशतवादी ठार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती. मात्र, आता ती वेळ राहिली नसून आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही दिवसांपासून जम्मू काश्‍मीरमधील हिंदू आणि शीख समुदायावर हल्ले वाढले आहेत. तसेच भारतीय सैनिकांही लक्ष केले जात आहे. भारतीय सैन्य आणि जम्मू काश्‍मीर पोलीस बहुतांश कारवाया हाणून पाडत असले, तरी पाकिस्तानपुरस्कृत कारवायांमुळे पुन्हा तणाव वाढयाची शक्‍यता आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: Be ready for another surgical strike warns Amit Shah to Paki
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे