धक्कादायक! बॅंक मॅनेजरचा मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत...

शिल्पी सोनम या अपना बाजार येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत होते.

झज्जर (हरियाणा): बहादुरगडमधील बँक ऑफ बडोदाच्या सीनिअर मॅनेजरचा मृतदेह पतीच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिल्पी सोनम असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या रांची येथे काम करत होत्या.

पतीच्या अंथरुणात ठेवले लाल कुंकू, मंतरलेले लिंबू अन्...

शिल्पी सोनम यांचा पती झज्जर जिल्ह्यातील जसोरखेडी गावातील हरियाणा बँकेत काम करतो. बहादुरगडमधील सेक्टर 6 पोलिस ठाणे हद्दीत मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारावर तिच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंडमधील रांचीतील एचआसी कॉलनीत राहणाऱ्या शिल्पी सोनम या अपना बाजार येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यांचा पती हा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील जसोरखेडी गावात हरयाणा ग्रामीण बँकेत काम करत आहे. 

धक्कादायक! आपण गर्भवती असल्याचे समजले तर काय होईल?

शिल्पी सोनमचे भाऊ दीपक कुमार याने सांगितले की, शिल्पीचा नवरा तिला त्रास देत होता. शिवाय, नशेचा ओव्हरडोस घेत असल्याने बहीण सासरी रांची येथे राहत होती. 4 सप्टेंबर रोजी त्याची बहीण शिल्पी सोनम आपली दोन मुले आणि राकेशच्या भाच्यांसह बहादुरगड येथे आली होती. येथे आल्यानंतर राकेशने तिला त्रास सुरू केला. यादरम्यान शिल्पी सोनम हिचा मृतदेह तिच्याच पतीच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. राकेशने याबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Bank of Barodas female branch managers dead body found hangi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे