धक्कादायक! मैत्रीणीला अश्लिल फोटो व्हायरल केल्याचे समजले अन्...

सोशल मीडियावर अश्लिल फोटो पोस्ट केल्यामुळे संतापलेल्या युवतीने तिच्या लिव्ह इन पार्टनरचा मित्रांसोबत मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बंगळुरू: सोशल मीडियावर अश्लिल फोटो पोस्ट केल्यामुळे संतापलेल्या युवतीने तिच्या लिव्ह इन पार्टनरचा मित्रांसोबत मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या युवकाची हत्या झाली तो व्यवसायाने डॉक्टर होता. तर आरोपी युवती ही आर्किटेक्ट आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

डॉक्टर विकास आणि युवती लिव्ह इन पार्टनरशिपमध्ये राहात होते. काही दिवसांनी दोघं लग्न बंधनांत अडकणार होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, युवती आणि तिच्या आईचा न्यूड फोटो कुणीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर अपलोड केला होता. त्याचसोबत इतर मित्रांनाही पाठवला होता. युवतीने जेव्हा या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा तिच्यासोबत लिव्ह इन म्हणून राहणाऱ्या विकासनेच बनावट खाते बनवून ते फोटो अपलोड केल्याची माहिती समजली. यामुळे १० दिवसांपूर्वी युवती आणि विकासमध्ये या प्रकारावरून वाद झाला होता. 

युवतीने तिच्या मित्रांना घरी बोलावले आणि अश्लिल फोटोवरून चौघांनी विकासला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असता तो कोमात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर १४ सप्टेंबरला विकासचा मृत्यू झाला. 

डॉक्टर विकास यूक्रेनहून परतल्यानंतर एका खासगी रुग्णालयात काम करत होता. हत्येतील आरोपी युवतीसोबत तो लिव्ह इनमध्ये राहत होता. दोघांच्या कुटुंबाना याबाबत माहिती होती. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी युवतीसह तिच्या २ सहकारी मित्रांना अटक केली आहे. तर अन्य १ जण फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बापरे! सख्ख्या भावांचे एकाच महिलेसोबत अनैतिक संबंध; घडले भयानक...

धक्कादायक! नवरा अचानक आला अन् पत्नीला पुतण्यासोबत पाहिल्यावर...

आंधळे प्रेम! मामीचा जडला अल्पवयीन भाच्यावर जीव अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! आमचं प्रेम समाजाला मान्य नाही; कारण...

धक्कादायक! सुनेचे अनैतिक संबंध अन् सासऱयाचा गेला जीव...

धक्कादायक! एका प्रेमाची भयानक गोष्ट; मावस बहिणीवर जडले प्रेम अन्...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: banglore crime news girl and her friend murder live in relat
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे