वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूने गाढले; गावावर शोककळा...

ऐन वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा मृत्यू झाला झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद: ऐन वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा मृत्यू झाला झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील ही घटना आहे. विकास शेजवळ असे मृत युवकाचे नाव आहे. 

विकास याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक आणण्यासाठी तो दाजी सुरेश भालेराव यांच्यासोबत फुलंब्रीला गेला होता. मात्र, घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, यातील विकास शेजवळ याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ऐन वाढदिवसांच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

विकास शेजवळ हा दाजी सुरेश भालेराव यांच्यासोबत केक आणण्यासाठी फुलंब्रीला गेला होता. केक घेऊन घरी परतत असताना फुलंब्री-राजुर रोडवरील ज्ञानसागर विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील विकास शेजवळ याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरेश भालेराव हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबामधील एका रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांचेही मन हेलावले...

एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीत; कारण समोर...

हृदयद्रावक! कारच्या सनरूफमध्ये उभा राहिला अन् मांजाने चिरला गळा...

हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...

हृदयद्रावक! पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! चिमुकलीपाठोपाठ आईनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! वडिलांपाठोपाठ नेमबाज मोनाली गोऱ्हे यांनीही सोडला प्राण

हृदयद्रावक! जुळे भाऊ एकत्र जन्मले अन् एकत्रच गेलेही...

हृदयद्रावक! सख्ख्या भावांनी दोन तासांच्या अंतरानी घेतला जगाचा निरोप

निशब्ध! तीन सख्ख्या भावंडांचा कोरोनाने मृत्यू...

हृदयद्रावक! दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू...

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांचा अवघ्या तासांत कोरोनाने घेतला बळी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: aurangabad crime news youth dead on birthday at accident and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे