हृदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांचेही मन हेलावले...

पती नोकरीवर आणि सासूसासरे बाहेर गेल्यानंतर महिलेने दोन वर्षांच्या चिमुकलीला टीव्हीवर कार्टून लावून दिला होता.

औरंगाबाद : पती नोकरीवर आणि सासूसासरे बाहेर गेल्यानंतर महिलेने दोन वर्षांच्या चिमुकलीला टीव्हीवर कार्टून लावून दिला आणि बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतल्याची धक्कादाय घटना घडली आहे. काही वेळानंतर चिमुकली आईच्या मृतदेहाजवळ जाऊन रडत होती. हृदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांचेही मन हळहळले.

औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात समोर आली. रुपाली मयूर गायकवाड (वय 20, रा. आनंदनगर गल्ली क्र. 4, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मुलीच्या रडण्याने आवाजाने ही घटना उघड झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मृत रुपालीने पती मयूरसोबत जेवण केले. त्यावेळी ती आनंदी होती. जेवण झाल्यानंतर मयूर नोकरीवर निघून गेला. सासू आणि सासरे देखील दुकानावर गेले. दोन वर्षीय चिमुकली आकांक्षा आणि रुपाली या दोघीच घरात होत्या. दरम्यान रुपालीने वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आकांक्षाला टीव्हीवर कार्टून लावून दिले आणि ती खाली बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये स्कार्फने तिने गळफास घेतला. चिमुकलीला आई दिसत नसल्याने खाली बेडरूममध्ये आली व आईजवळ रडत बसली. चिमुकलीचा रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता रुपालीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली.

पोलिसांना समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविला. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. कारण, घरात कुठलाही वाद नसताना आणि मृत्यूपूर्वी काही काळ आधीच पतीसह आनंदाने जेवण करणाऱ्या रुपालीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीत; कारण समोर...

हृदयद्रावक! कारच्या सनरूफमध्ये उभा राहिला अन् मांजाने चिरला गळा...

हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...

हृदयद्रावक! पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! चिमुकलीपाठोपाठ आईनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! वडिलांपाठोपाठ नेमबाज मोनाली गोऱ्हे यांनीही सोडला प्राण

हृदयद्रावक! जुळे भाऊ एकत्र जन्मले अन् एकत्रच गेलेही...

हृदयद्रावक! सख्ख्या भावांनी दोन तासांच्या अंतरानी घेतला जगाचा निरोप

निशब्ध! तीन सख्ख्या भावंडांचा कोरोनाने मृत्यू...

हृदयद्रावक! दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू...

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांचा अवघ्या तासांत कोरोनाने घेतला बळी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: aurangabad crime news mother suicide and her two year girl c
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे