तलावातली मोटार काढली बाहेर; पण वेळ निघून गेली होती...

करमाड परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यात पडलेली मोटार आज (बुधवार) बाहेर काढण्यात आली आहे.

औरंगाबाद: करमाड परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यात पडलेली मोटार आज (बुधवार) बाहेर काढण्यात आली आहे. मोटारीमधील तिघांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मृतांमध्ये एका पुरुषासह दोन महिलांचा समावेश आहे.

वैजीनाथ उमाजी चौधरी (वय 52), मंगल वैजीनाथ चौधरी (वय 45), सुकन्या मधुर चौधरी (वय 22, सर्व रा. गजानन नगर, औरंगाबाद) अशी मोटारीमधील मृतांची नावे आहेत. करमाडच्या जवळच असलेल्या जडगाव येथे ही घटना घडली होती. तब्बल पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर हे चारचाकी वाहन बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी असलेल्या तलावात कोसळली होती. तलावातील पाणी खोल असल्यामुळे गाडीतील तिन्ही प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वैजीनाथ चौधरी हे मोटारीने आपली पत्नी व सुनेला घेऊन दर्शनासाठी एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जात होते. जडगाव येथील नातेवाईक राजेंद्र वाघ यांना भेटून पुढे एकलहरा येथे जाण्याचा बेत ठरवला. लाडगावहून जात असताना जडगावच्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ चौधरी यांचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार बंधाऱ्यात पडली होती. त्यांनी मोबाइलद्वारे नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद पडला होता.
या बंधाऱ्यात जवळपास 30-40 फूट पाणी खोल असल्याने मोटारीचा शोध घेण्यास अडचण येत होती. या वेळी अग्निशमन दलाचे 25 जवान व गावकऱ्यांनी पाच तास अथक प्रयत्न करून सायंकाळी पावणेसात वाजता क्रेनच्या मदतीने मोटार पाण्याबाहेर काढली. पण, दुदैवाने मोटारीमधील तिघांचा मृत्यू झाला होता.

Title: aurangabad crime news car fall in water three dead body foun
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे