प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्येने उडाली खळबळ...

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल माधवराव आग्रहारकर (वय 55) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांसोबत बुधवारी रात्री जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी 8.30 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून व्यापाऱ्याला आर्थिक त्रास असल्याची परिवाराने माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.

धक्कादायक! विद्यार्थिनीने वसतिगृहात घेतला गळफास; कारण...

'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...

धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: aurangabad crime news builder anil augararkar committed suic
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे