कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे याची यशोगाथा...

मेघाली या शालेय जिवनापासूनच उत्तम धावपटू. एकदा असे काही घडले की, मेघाली यांचा भाऊ दहावीच्या वर्गात नापास झाले व वडिलांनी त्याची सर्व पुस्तके जाळली. तोच दिवस मेघाली यांच्या आयुष्यातील वळणमार्ग ठरला.

मेघाली गावंडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यांतील विठोली नावाच्या छोट्याशा गावात झाला. घरी आई-वडील व दोन भाऊ. वडील ग्रामसेवक व लालमातीतील पट्टीचे पैलवान. त्यामुळे ते कायम म्हणायचे मला तिन्ही मुलेच आहेत. मेघाली पण मुलगाच समजत.

मेघाली या शालेय जिवनापासूनच उत्तम धावपटू. एकदा असे काही घडले की, मेघाली यांचा भाऊ दहावीच्या वर्गात नापास झाला व वडिलांनी त्याची सर्व पुस्तके जाळली. तोच दिवस मेघाली यांच्या आयुष्यातील वळणमार्ग ठरला. आता वडीलांच्या सर्व ईच्छा आपनच पुर्ण करायच्या असा ध्यास घेतला. मोठ्या जिद्दीने शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले व पदवीधर शिक्षणासाठी अमरावती शहरातील नामांकित विदर्भ महाविद्यालयात प्राणीशास्त्रासाठी (MSC Zoology) प्रवेश घेतला.

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

याच दरम्यान महिला वसतीग्रुहात सर्व वरिष्ठ विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत होते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेले पोलिस अधिकार्याचे छायाचित्र पाहिले. या चित्राची मेघाली यांना भुरळ पडली. भुरळ पुढे त्यांना स्वस्थ बसू देईना, आपनही परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस अधिकारी होऊ शकतो. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २००८ साली दिली व पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. पदविका अभ्यासक्रम अपुर्ण असल्यामुळे ही संधी हुकली. परत २०११ साली परीक्षा दिली व थेट पोलिस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली.

...आणि सुरु झाला पोलिस खात्यातील प्रवास
वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर यांची बदली ही परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक या पदावर चंद्रपुर जिल्हा पोलिस दलात नियुक्ती झाली. वर्षभराच्या आत आपला परीविक्षाधिन कार्यकाल संपताच त्यांची नियुक्ती जिल्ह्यातीलच भद्रावती पोलिस स्टेशन येथे झाली. याचदरम्यान मेघाली गावंडे यांच्याकरवी जन्मदात्या वडिलांकडून आपल्याच मुलीवर ६ वर्षापासून करीत असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करण्याची संधी मिळाली. तोच तपास यशस्वीरित्या केला व  त्यांनी आरोपीस गजाआड करुन आपल्या पहिल्याच धाडसी कार्यवाहीची चुणूक दाखविली. त्याचप्रमाण महाराष्ट्रभर गाजत असलेले भोंदुबाबा पैशाचा पाऊस पाडणारे प्रकरणात घटनास्थळावर जाऊन भोंदुबाबासह महिलांना रंगेहात पकडले व ही केलेली कार्यवाही कौतुकासही पात्र ठरली.

वर्धा जिल्ह्यातील कार्यवाही व यश...
मेघाली यांची पुढे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून वर्धा जिल्हा पोलिस दलात बदली झाली. शहरातील रामनगर पोलिस ठाणे येथे नेमणूक झाली. त्यांच्यातील कामांची तत्परता बघता त्यांना महिला भरोसा सेल व दामीनी पथकाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. या सर्व जबाबदाऱया अगदी चोख पार पाडल्या. दामिनी पथकात काम करत असताना जिल्हा पोलिसांमार्फत दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर आलेल्या मुलींच्या तक्रारीवरुन शहरातील मुलींच्या वसतीगृहातील संस्थाचालकाद्वारे होणार्या शारीरिक छळाची तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करुन आरोपीस जेरबंद केले. आपल्यातील चानाक्ष कामाचा परीचय दिला.

वारंवार नापास झालो, पण फौजदार झालोच!

पती-पत्नी पोलिस दलात...
मेघाली गावंडे यांच्या यशामागे त्यांचे पती महेंद्र इंगळे सदैव उभे आहेत. ते स्वत: वर्धा पोलिस दलात स्थानिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या सर्व जबाबदार्या त्या निष्ठेने पार पाडतात व नेहमीच कौतुकाची थाप मिळवताना दिसतात.

बारावीत दोनदा नापास; तरीही आयपीएस...

अशा या पोलिस खात्यातील रनरागिनीस पोलिसकाका टीमतर्फे पुढील वाटचालीस हार्दिक हार्दीक शुभेच्छा💐💐💐💐

Title: api meghali gawande success story in maharashtra police