बलात्कारादरम्यान नवरा, मुलगा विनवणी करत होते पण...

संपूर्ण राज्यात टोळी असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या.

गुंटूर (आंध्र प्रदेश): गुंटूरमध्ये चार महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. घटनेवेळी पीडित महिलेचा मुलगा, नवरा विनवणी करत राहिले पण नराधमाने ऐकले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चार महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात टोळी असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून गुंटूर जिल्ह्यात राहणाऱ्या या टोळक्याने घडवलेल्या चोरीच्या लागोपाठ घटनांमुळे पोलिसांची झोप उडवली होती. सप्टेंबरमध्ये गुंटूरच्या मेडिकोंडूर पोलिस स्टेशन हद्दीतील पलाडुगु साइड रोडवरील सट्टानापल्ली येथील एका जोडप्यावर या टोळीने हल्ला केला होता. आरोपींनी आधी पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपींनी आणखी दोन जोडप्यांना लक्ष्य केले. टोळीतील गुंडांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या टोळीने दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका कुटुंबाला अडवून बेदम मारहाण केली. मुलासमोरच त्याने आईसोबत क्रूर कृत्य केले. पतीने विरोध केल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली होती.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि बोटांच्या ठशांच्या आधारे टोळीचा सदस्य कुरनूल जिल्ह्यातील पन्याम भागातील रहिवासी असल्याचे समजले. पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले असता ते शेतात काम करणारे मजूर असल्याचा बहाणा करत होते.  पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सध्या २ आरोपी फरार आहेत. आरोपींनी राज्यात ३० हून अधिक बलात्कार आणि लुटमार केल्याची कबुली दिली आहे.

हृदयद्रावक! नवविवाहित जोडपे खोलीत झोपायला गेले अन्...

Bulli Bai App च्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: andhra pradesh crime news police arrested for women tourcher
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे