वादग्रस्त लव्ह जिहादबाबत पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग म्हणाल्या...

अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. अखेरीस या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

अमरावती: अमरावती शहरातील वादग्रस्त लव्ह जिहाद प्रकरण व त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्यामध्ये घडलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. अखेरीस या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. बेपत्ता असलेली मुलगी साताऱ्यात सापडली असून, पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले आहे. घरगुती रागातून संंबंधित मुलगी घराबाहेर निघून गेल्याची माहिती पुढे आली होती.

अमरावती जिल्ह्यातील युवती (वय १९) दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या मैत्रिणी ने दिलेल्या माहितीवरून, ती सोहेल शहा नावाच्या युवकाच्या संपर्कात होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळतच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी सोहेल शहा याला ताब्यात घेतले होते. मुलीचा तातडीने शोध घ्यावा यासाठी भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धरणे आंदोलन सुद्धा केले होते.

खासदार नवनीत राणा सुद्धा या प्रकरणात आक्रमक झाल्या होत्या. या प्रकरणावरून नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. अखेरीस राजापेठ पोलिसांनी या युवतीचा शोध लावला असून, ती सातारा येथे आढळली. पोलिसांनी मुलीचा सुखरूप शोध घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा अभिनंदन केले आहे.

दरम्यान, युवतीचा मोबाईल बंद होता. मात्र, जो युवक पोलिसांच्या ताब्यात होता त्यांच्या व तीच्या संभाषणावरून मुलगी ही साताराच्या दिशेने रेल्वेने जात असल्याचे पोलिसांना कळले होते. तेव्हा तत्काळ सातारा पोलिस आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून सदर मुलीला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त आरती सिंग यांनी दिली होती.

अमरावतीमध्ये पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणा यांना सुनावलं...

अमरावतीमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला नवे वळण...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: amravati love jihad and police commissioner dr aarti singh s
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे