धक्कादायक! आपण गर्भवती असल्याचे समजले तर काय होईल?

एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित युवतीवर तिच्याच गावातील एकाने बलात्कार केला होता. बदनामीच्या भीतीमुळे पीडित युवतीने या घटनेची वाच्यता कुठेही केली नव्हती.

अमरावती : एका अल्पवयीन मुलीने बलात्कारातून गर्भवती राहिल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मुंबई बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश...

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित युवतीवर तिच्याच गावातील एकाने बलात्कार केला होता. बदनामीच्या भीतीमुळे पीडित युवतीने या घटनेची वाच्यता कुठेही केली नव्हती. यानंतर आरोपीने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अनेकवेळा बळजबरी केली होती. यातूनच पीडित युवती 7 महिन्यांची गर्भवती राहिली होती.

मुंबई बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी...

आपण गर्भवती असल्याचे गावातील नागरिकांना समजले तर काय होईल? या भीतीतून पीडित युवतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण त्यानंतर मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येवदा पोलिस ठाण्यात जाऊन गावातील एका युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो, बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील बलात्काराच्या तपासादरम्यान समोर आली धक्कादायक माहिती...

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत येवदा पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस सध्या आरोपी युवकाची चौकशी करत आहेत.

माणूसकीला काळीमा! चिमुकलीवर बलात्कार करून काढले डोळे...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: amravati crime news minor girl commits suicide after she bec
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे