कॉलेजला जाताना टिप्पर तिच्यासाठी काळ बनून आला...

कॉलेजला निघालेल्या युवतीचा टिप्परच्या मागच्याचाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

अमरावती : कॉलेजला निघालेल्या युवतीचा टिप्परच्या मागच्याचाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हनवत खेडा (ता. अचलपूर) येथे घडली आहे. प्रतीक्षा राजेंद्र गावंडे असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. प्रतीक्षा ही परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात एम. कॉमला शिकत होती. तिच्या मृत्युमुळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

प्रतीक्षा आपल्या दुचाकीने घरून महाविद्यालयात जायला निघाली होती. वाटेतच एमएच २७ एक्स ६८५६ क्रमांकाच्या टिप्परने तिला चिरडले. त्यात टिप्परच्या मागच्या चाकाखाली आलेल्या प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक तिथून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं. पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

प्रतीक्षाला एम. कॉम. पूर्ण करायचे होते. शिवाय, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासदेखील सुरू केला होता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याची स्वप्न प्रतीक्षा बघत होती. पण, टिप्पर तिच्यासाठी काळ बनून आला आणि प्रतीक्षाचा दुर्देवी अंत झाला.

हृदयद्रावक! लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न अन् वडिलांचा मृत्यू...

हृदयद्रावक! म्हशीचा अचानक धक्का लागला अन्...

हृदयद्रावक! बाळाच्या पाळण्याच्या दोरीने घेतला गळफास...

हृदयद्रावक! कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार करताना फुटला अश्रूंचा बांध...

पुणे-नगर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटूंबातील चौघे ठार

हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...

हृदयद्रावक! एकाच चितेवर मायलेकींवर अंत्यसंस्कार...

हृदयद्रावक! दीड महिन्यापूर्वीच झाले होते लग्न अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: amravati crime news collage girl pratiksha gawande killed ac
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे