...म्हणून विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण; पाहा Video

एका विद्यार्थिनीला जमीनीवर पाडून इतर विद्यार्थिनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लाहोर (पाकिस्तान): एका विद्यार्थिनीला जमीनीवर पाडून इतर विद्यार्थिनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थिनीने ड्रग्ज घेण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, तीन मुली त्यांचा वर्गमैत्रीणीला झिंज्या उपटून जमिनीवर पाडून मारत आहेत. त्या मुलीच्या अंगावर एक मुलगी बसली आहे. थोड्या वेळात अजून एक मुलगी त्या मुलीच्या पायावर येऊन बसते. ती मुलगी उठण्यासाठी अतोनात प्रयत्न करते. पण त्या दोघी तिच्या अंगावरुन उठत नाहीत. तिथे उभी असलेली तिसरी मुलगी तिच्या डोक्याला पाय मारते. त्या मुलीचे डोक जमिनीवर आपटले जाते. तिसरी मुलगी तिचे केसही ओढते. शिवाय, तिघी मुली त्या विद्यार्थींनीला शिवीगाळ करत आहेत, तर  इतर मुली या घटनेचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत.'

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडीतेच्या वडिलांनी या घटनेची लेखी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीने त्या तिघींना ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने तिला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तिन मुलींपैकी एक मुलगी बॉक्सर आहे. या मारहाणीत पीडित मुलीच्या चेहऱ्याला आणि मानेला जखमा झाल्या आहेत. 

लाहोर येथील एका उच्चभ्रू शाळेत हा प्रकार घडला आहे. पीटीआय सदस्य महीन फैसल यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. एक अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलमधील हे दृश्य आहे. विद्यार्थीनीने मद्यपान करण्यास नकार दिल्यामुळे तिला मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक...

इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...

पाकिस्तानात दोन गटांमध्ये तुफान गोळीबार; १० जणांचा मृत्यू

संतापजनक! पाकिस्तानमध्ये बकरीवर केला सामूहिक बलात्कार अन्...

Video: पाकिस्तानमध्ये रिक्षात पळत चढून घेतला महिलेचा 'किस'

अमानुष कृत्य! पाकमध्ये चिमुकलीवर बलात्कार करून गुप्तांगावर केले वार अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: American International School in defence Lahore video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे