अजब प्रेम की गजब कहानी; लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन्...

एक दिवस मोबाईलवरून चुकीचा नंबर डायल केला. पण, चुकीचा नंबर लक्षात आल्यावर लगेच फोन कट केला. काही वेळानंतर त्याच नंबरवरून एका मुलीचा फोन आला.

पाटणा (बिहार): देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात अडकून पडले. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाले तर काही जणांचा विवाह पार पडले. अजब प्रेम की गजब कहानी, येथे घडली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी पडले प्रेमात अन् केला विवाह...

मलमली गावामध्ये राहणारा अबू कलाम लॉकडाऊनमुळे काम नसल्यामुळे घरीच होता. एक दिवस मोबाईलवरून चुकीचा नंबर डायल केला. पण, चुकीचा नंबर लक्षात आल्यावर लगेच फोन कट केला. काही वेळानंतर त्याच नंबरवरून एका मुलीचा फोन आला. अबू याने दिलगिरी व्यक्त केली. मुलीनेही माफ केले. पण, मुलीने पुन्हा फोन केला आणि दोघांमध्ये फोनवरून बोलणे सुरू झाले.

लॉकडाऊनमध्ये दोघे तासनतास फोनवरून बोलू लागले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर व्हिडिओ कॉलवरून एकमेकांना पाहू लागले. प्रेमात बुडाल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुलीने घरच्यांना न सांगता प्रियकराच्या गावात आली. मुलीच्या घरचे तिचा शोध घेत आले. रुईधासा मैदानावर दोघे बसले होते. मुलीच्या नातेवाईकांनी तिला घरी जाण्यासाठी प्रयत्न केला. पण, तिने आरडा-ओरड सुरू केली. यामुळे घटनास्थळी नागरिक जमा झाले. काही वेळानंतर गर्दी पाहून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रेमीयुगलासह नातेवाईकांना चौकीत घेऊन गेले.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात अऩ्...

पोलिस चौकीत गेल्यानंतरही मुलगी विवाह करायचा म्हणून सांगत होती. सर्वांनी समजूत काढली पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर दोघांच्या नातेवाईकांनी विवाहाला मान्यता दिली आणि पोलिस चौकीतच दोघांचा विवाह लावण्यात आला. दरम्यान, एका मिस कॉलवरून सुरू झालेली प्रेम कहाणी विवाहाच्या बंधनात अडकली. पोलिसांसह नातेवाईकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या.

प्रेमीयुगलाने लॉकडाऊनमुळे हाल होत असल्याचे पोलिसांना सांगितले अन्...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: amazing love story ajab prem ki ghazab kahani missed call me
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे